करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
            संप्रणाली
 
            माहितीचे मुद्दे
 
            संर्पकासाठी
 
आभार कुलवॄत्तांचे प्रयोजन दाही दिशा प्रकाशित कुलवृत्तांत  
 
संपादकीय निवेदन     1  2  3           
 

फ़ोटो-
कुलवृत्तांत माहितीबरोबरच कुलदेवातांचे व ग्राम देवाताचे फ़ोटो छापण्यात आले आहेत. तसेच जेवढे शक्य झाले तेवढे व्यक्तीचे फ़ोटो, ग्रुप फ़ोटो, पती पत्नींचे फ़ोटो व इतर फ़ोटो छापण्यात आले आहेत जुन्या काळ्पासुन आज पर्यत आपले व्यक्तीमत्व पोशाख स्त्रियांचा पेहराव त्यांच्या अंगावरील दागिने, केशभूषा इत्यादीमध्ये कालानुरुप झालेले बदल आपणाला ह्या फ़ोटोद्वारे पहाता येईल.आजच्या नवीन पिढीला आपले पुर्वज कसे दिसत होते ह्याची कल्पना येईल
ग्रंथछपाई-
ग्रंथछपाई हे काम अत्यंत कठिण, जिकरीचे व क्लिष्ट. तरीही ह्या कामामध्ये अनेकांनी मदत केल्याने हे कामही फ़ारसे कठीण राहिले नाही. प्रुफ़े तपासण्याचे कामात ज्यांनी मदत केली त्यांचे शतश: आभार.
आभार व समारोप-
हा कुलवृत्तात संकलनापासुन छ्पाईपर्यत ज्यांनी ज्यांनी मला मदत केली. तसेच ह्या कामात ज्यांनी ज्यांनी हस्ते परहस्ते मदत केली परंतु त्यांचा नामनिर्दश येऊ शकला नाही त्या सर्व मंडळीचे आभार मानतो. तसेच इतर संदर्भग्रंथ तसेच इतर कुलवृतांतील लेख जे ह्या कुलवृतांत समाविष्ट केले आहेत त्या सर्व लेखकांचे आभार मानतो. घरातले कार्य म्हटले की कुटूंबातील सर्वच मंडळी व आप्तेष्ट सहाय्य करतात.त्याप्रकारे घरातील सर्व लहानमुलांपासून ते पत्न्नीपर्यंत सर्वांनी ह्या कार्यात आम्हाला मदत केली. घरचे मंडळीचे आभार मानण्याची प्रथा नाही तरीही माझी पत्न्नी सौ.वृषाली (विजया)तसेच मुली नमिता व शिल्पा माझ्या सासूबाई श्रीमती मालतीबाई देवधर ह्यांचेही मी आभार मानतो. तसेच दत्तात्रय नागेश (अंधेरी), अनंत कृष्णाजी (विलेपार्ल)व रघूनाथ (बोरीवली) ह्यांच्या अथक प्रयत्न्नावाचून हा प्रकल्प झालाच नसता त्याकरता त्यांचे मन:पूर्वक आभार.
ह्या ग्रंथाच्या लिखाणाचे काम खरे पाहता जूलै/ऑगष्ट १९९८ नंतरच सुरु झाले. त्यानंतर माहीती जमा करुन संकलन करण्यात गेलेले दिवस, तसेच स्वत: चा सी.ए.चा व्यवसाय सांभाळण्यात गेलेले दिवस माझे वडील बंधू ह्यांच्या १ डिसेंबर १९९८ रोजी झालेल्या आकस्मिक निधानामुळे झालेली कूटूंबातील पोकळी भरुन काढण्यात गेलेले दिवस तसेच ह्या अशा कामाचा पृर्वानुभवन नसल्याने झालेला विलंब ,अशा सर्व गोष्टीचा विचार करता आज हा कुलवृत्तांत आपणासमोर मांडता येत आहे. हिच माझ्या द्ष्टीने मोठी समाधानाची गोष्ट् आहे.
काळ आणि इतिहास कधीच संपत नाहीत. तेव्हा माहितीची कालसापेक्ष नोंद करताना सर्व बाजुंच्या सर्व गोष्टीची नोंदणी होत नाही त्यामूळे त्रुटी,उणीवा राहणे शक्य असते.मिळाली तेवढी माहिती एकत्रित करुन ह्या पूस्तकात देण्याचा प्रयत्न्न केला आहे माहिती देण्यात काही चुका झाल्या असतील,काही उणीवा राहिल्याअसतील तर कुलबंधूनी त्या कृपया आम्हास कळवाव्यात कारण पूढील आवृत्तीत त्याची योग्य ती दखल घेतली जाईल. मी येथे एक गोष्ट खास नमूद करु इच्छितो की जरी ह्या कुलवृत्ताताचे संकलन मी एकट्याने केले असले तरी लिखाण्याचे काम माझ्याच बरोबरीने माझ्या खांद्दाला खांदा भिडवुन श्री द्त्तात्रय नागेश (अंधेरी) श्री अनंत कृष्णाजी (विलेपार्ल) व श्री रघुनाथ (बोरीवली) ह्यानी के ले आहे किंबहूना लिखाण्यातील मदतीतश्री द्त्तात्रय नागेश (अंधेरी) ह्यांचा सिंहाचा वाटा आहे व ह्यात अनेकांचे सहकार्य लाभले.
कुलवृत्तांत हे एक प्रकारचे पितरांचे पुज्यस्मरण आहे. गेली काही वर्ष ह्या कामात गेली ती आज सार्थकी लागल्याचे वाटते. सर्व कुलबंधु ह्या पुस्तकाची एक तरी प्रत आपल्या घरी संग्रही ठेवतील व समाधान पावतील ही आशा बाळगतो नव्हे तर माझी तशी खात्रीच आहे. आपणा सर्व कुलबांधवाचे हातुन कुलस्वामीनी श्री केळाईदेवी व कुलस्वामी श्री हरीहरेश्वर ह्याच्या कृपने, आपल्या कुलाच्या वैभवाची, देशहिताची जनहिताची व धर्महिताची महत्कार्य होवोत अशी त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना आहे. ही अल्प सेवा श्री करमरकर कुलातील सर्व लहान थोरांवर श्री हरीहरेश्वर कुलदैवत व श्री केळाईदैवी कुलदैवता ह्यांनी आपले कृपाछत्र सतत ठेवावे अशी त्याचे जवळ नम्र प्रार्थना करु हे संपादकीय निवेदन पुरे करतो.
"सर्वे५पि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया:!
"सर्वे भद्रणि पश्यन्तु मा काश्चित दु:खमाप्नुयात !! "

  श्री. श्याम रघुनाथ करमरकर.
संपादक
 
मागे      
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+