वेब-डेटाबेस व संगणक-प्रणाली वापरल्यामुळे फक्त शोधण्याचा वेग (स्पीड) वाढतो असें नसून इतर अनेक बाबतीत आपल्याल त्याचे फायदे मिळतात. कोणत्याही व्यक्तीची फक्त थोडीशीच माहिती (फक्त अ] गटाटील) प्रत्यक्ष टाइप करून डेटाबेसमध्ये भरली तरी चालते. हा 'अमुक एका गृहस्थांचा' मुलगा एवढे प्रत्यक्ष टाइप करून भरले कीं, त्याची आई कोण, भाऊ-बहिणी कोणकोण, तसेंच त्यांच्याशी निगडित माहिती आपोआप (संगणकातर्फे) त्या व्यक्तीच्या खात्यांत भरले जाते. त्याच्या पत्नीची स्वतंत्र नोंदणी झाली कीं तिचे नाव पतीच्या खात्यांतही लिहिले जाते, एवढेच नाही तर, पतीच्या खात्यांत श्वसुरांचे नाव, सासुरवाडीचे आडनाव ही आपोआप लिहिले जाते. ती व्यक्ती ज्यांचा मुलगा/मुलगी म्हणून नोंदविली जाते, त्यांच्या खात्यांत मुला/मुलीं च्या यादींत तशी भरही पडते. यासारख्या ज्या गोष्टी संगणकामुळे आपोआप (पडद्यामागे) होतात त्यांचा उल्लेख खालीं ब] गटांत केलेला आहे. क] गटातील माहिती दिली नाहीं तरी कुलवृत्तान्तातील त्या व्यक्तीचे स्थान व परस्पर संबंध बदलत नाहीत; पण ती दिल्यामुळे त्या व्यक्तीबद्दल सविस्तर माहिती वाचतां येते. जुन्या पिढीतील व्यक्तींबद्दल फार कमी माहिती उपलब्ध असल्यानें क] गट जवळजवळ रिकामाच असतो. काही व्यक्ती प्रसिद्ध असल्यानें त्यांच्या बाबतीत वैशिष्ठ्यांचे स्वतंत्र पान देखील असते, फोटो देखील असतात. ड] गटातील माहिती फक्त आजच्या काळांत हयात असलेल्या व्यक्तींब्द्दल भरतात.
एखाद्या व्यक्तीच्या माहितीत काही बदल करायचा असल्यास, किंवा त्यांत काही भर टाकायची असल्यास, संबंधित' व्यक्तींनीं नातू' कुल मंडळाला तसें लिखित स्वरूपांत (पोस्टानें किंवा ई-मेलनें) कळवावे; म्हणजे वेळोवेळीं केल्या जाणाऱ्या अपडेट मध्ये त्याचा अंतर्भाव करतां येईल. संगणकाच्या डेटाबेसमध्ये व्यक्तींच्या खात्यावर असणारी माहिती...
अ] प्रत्यक्ष भरलेली प्राथमिक माहिती:-
1) व्यक्तीचे नाव व उपनाव (टोपणनाव)
2) वडिलांचे नाव व उपनाव (टोपणनाव)
3) जन्मतारीख (किंवा वर्ष) आणि दिवंगत असल्यास निर्वाणाची तारीख (किंवा वर्ष)
4) व्यक्ती: पुरूष (अमक्याचा मुलगा) / स्त्री (अमक्याची मुलगी किंवा पत्नी) म्हणून नोंद.
5) सासुरवाशिणींच्या वडिलांचे नाव व माहेरचे आडनाव.
6) माहेरवाशिणींचे (लग्न झालेले असल्यास) पतीचें नाव व सासरचे आडनाव.
7) घराण्याचे (व उपघराण्याचे) नाव व क्रमांक.
8) व्यक्तीची (वंशावळीप्रमाणे येणाऱ्या) पिढीचा क्र. } -हा संगणकाकडून आपोआप मिळतो.
9) व्यक्तीचा संगणकीय नोंद-क्रमांक } -हा संगणकाकडून आपोआप मिळतो.
ब] सर्व डेटाबेस वाचून संगणक खालील संबंधित माहिती आपोआप त्या व्यक्तीच्या नाववर लिहितो:-
10) व्यक्तीच्या आईचे नाव, तिचे माहेरचे नाव व माहेरचे आडनाव.
11) पुरूष किंवा माहेरवाशीण व्यक्तीच्या आजोबांचे (वडिलांच्या वडिलांचे) तसेच सासुरवाशिणीच्या सासऱ्यांचे नाव
12) पुरूष व्यक्तीच्या (विवाहित असल्यास) पत्नीचे नाव, माहेरचे नाव,
13) व्यक्तीच्या भावांची व बहिणीची संख्या.
14) व्यक्तीच्या मुलांची व मुलींची संख्या.
15) पुरूष किंवा सासुरवाशीण व्यक्तीच्या मुलांची (व सुनांची) आणि मुलींची (व सासरची) नावे.
16) पुरूष (विवाहित) व्यक्तीच्या सासऱ्यांचे नाव व आडनाव.
क] प्राथमिक माहितीशिवाय व्यक्तीची अजून काही माहिती ज्ञात असल्यास तीही भरता येते:-
17) व्यक्तीचे जन्मस्थान.
18) व्यक्तीच्या विवाहाची तारीख.
19) व्यक्तीचा रक्तगट.
20) व्यक्तीचे शिक्षण.
21) व्यक्तीचा व्यवसाय
22) व्यक्तीच्या वास्तव्याचे ठिकाण.
23) व्यक्तीची थोडक्यात जीवनवैशिष्ठ्ये -
24) प्रसिद्ध व्यक्तीसाठीं वैशिष्ठ्यांचे स्वतंत्र पान
25) व्यक्तीचा रंगीत किंवा कृष्णधवल फोटो (दिलेला असल्यास).
ड] फक्त हयात व्यक्तींसाठीं-
26) पूर्ण पोस्टल पत्ता
27) फोन (लॅन्डलाइन) नंबर
28) फॅक्स, मोबाइल नंबर
29) ई-मेल, वेब, इ.
30) संपर्क केव्हां साधावा-
'DYNAMIC' आणि 'STATIC' मधील फरक:-
या सर्व मुद्दयांवरील माहिती वेब-डेटाबेसमध्ये सुमारे 60 वेगवेगळ्या fields मध्ये साठविलेली असते. जेव्हां कोणत्याही मॉड्यूल मधून SQL-QUERY मार्फत जी विचारणा होते ती माहिती त्या स्वरूपांत क्षणार्धांत् स्क्रीनवर तुमच्यासमोर मांडली जाते.
या वेब-डेटाबेसची ठराविक अशी पाने तयर नाहीत; तुमच्या गरजेप्रमाणे पाहिजे ते पान (कितीही मोठे असले तरी) त्यावेळी तयार करून दाखविले जाते. म्हणून या डेटाबेसला 'DYNAMIC' असें म्हणतात. याउलट जे कुलवृत्तान्त CD ची पाने म्हणून, किंवा वेगळी PDF format मधील पाने म्हणून साइटवर ठेवतात; त्यांना मूलत: 'STATIC' म्हणावे लागते - कारण त्या पानांवरील मजकूर ज्यावेळीं साइट तयार झाली त्या-वेळचाच असतो, त्यांत काडीइतकाही बदल होणे शक्य नसते. एखाद्या कुटुंबांत एक-दोन मुलांचे विवाह होऊन त्यांना अपत्ये झालेली असतील तर तो बदल कदाचित् त्या PDF पानांत घालणे शक्य होणार नाही, व तो 'पुरवणी मध्ये लिहावा लागेल. वंशावळी च्या बाबतीत तर परिस्थिती बिकटच होईल.
या DYNAMIC डेटाबेसमध्ये सर्व बदल त्या-त्या जागीच झालेले असतात व स्क्रीनवर दिसणारे पान हें तोपर्यंतचे सर्व बदल विचारांत घेऊनच तयार झालेले असते. तेथें दिसणारी वंशावळ देखील ते सर्व बदल अंमलात आणूनच केलेली असते. |