सर्व कुलाचारामागे ईश्वराची उपासना हाच प्रधान हेतू असतो. काही सण व कुलाचार आखिल भारतीय स्वरुपाचे आहेत तर काही प्रांतिक स्वरुपाचे असुन प्रांतानिहाय तपाशिलात थोडा थोडा फरक दिसतो येथे, प्रामुख्याने महाराष्ट्रातील काही सण व कुलाचार दिले आहेत. पुष्कळशा धार्मिक चालीरिती व सणवारांची फक्त श्रेयनवाली देण्यापेक्षा कल्पना येईल अशी प्रत्येकाची थोडक्यात माहिती दिली आहे.
१)चैत्र
शालिवाहन शक कालगणनेप्रमाणे चैत्र हा पाहिला माहिना शालिवाहन शकाचे आकड्यात ७८ ही संख्या मिळविल्यावर इ.सनाचा आकडा येतो.
गुढीपाडवा - चैत्र शुध्द प्रातिपदेला पाडवा म्हणतात. शालिवाहन शक कालगणेप्रमाणे वर्षाचा आरंभ होतो वर्षातले साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त दिवस. लंकधिपती रावणचा वध केल्यावर सीता व लक्ष्मणासाहित श्रीराम १४ वर्षानंतर अयोध्येत आले तो दिवस चैत्र शुध्द प्रातिपदा. सर्व भारतीयांनी आपल्या घरावर गुढ्या उभारुन श्रीरामाबद्दलचा प्रेमभाव व्यक्त केला म्हणुन या दिवसाला गुढीपाडवा हे नाव पडले आहे ही परंपरा भारतीय आजही पाळीत आहेत.
चैत्रांगण - रोज सकाळी अंगण सारवुन त्यावर रांगोळीचे निरनिराळे प्रकार - चंद्र, सुर्य, गोपद्म इत्यादी काढुन त्याची पुजा करतात. हे चैत्रांगण गुढीपाडव्या पासुन अक्षयतृतीपर्यंत घालतात. सांप्रत जागेच्या संकोचामुळे प्रवेश दारासमोरच लहानशा जागेत मावेल अशा रांगोळ्या काढतात.
चैत्रगौरी (गजगौरी) - चैत्र शुध्द तृतीयाचे दिवशी गौरी ही माहेरी येते अशी समजुन आहे. त्या दिवशी तिच्या मुर्तीची स्थापना करुन अक्षयतृतीयेपर्यंत तिचे पुजन करतात व त्याच दिवशी सांगता करतात. या काळात सोईप्रमाणे मंगळवारी अगर शुक्रवारी या देवीच्या सांगता करतात. देवीच्या वारी आरास करुन त्यात तिची मृर्ती ठेवतात सायंकाळी सुवासिनीना हळदी कुंकुला बोलावतात त्या वेळी भिजलेल्या हरभा-यानी ओटी भरतात कैरीची डाळ व पन्हे देतात अलीकडे बदल त्या काळानुरुप रास करुन हळदी कुंकवाची प्रथा लोप पावत चालली आहे आता हळदी कुंकु करतात हा एक अन्नपुर्णचाच उत्सव असतो घरात अन्नधान्याची सतत समृध्दी राहु दे ही या कुलाचाराच्या मागची भावना आहे.
चैत्र शुध्द नवमी - चैत्र शुध्द नवमीला राम नवमी असे म्हणतात. त्या दिवशी अयोध्येत श्री रामाचा माध्यान्ही (दुपारी १२ वाजता) जन्म झाला. त्या निमित्ताने रामाचे व्रत करतात अष्टमीच्या दिवशी व्रताच्या संकल्प नवमीच्या दिवशी श्रीराम जन्माचा यथासांग सोहळा - रामाच्या प्रातिभेचे पुजन जप जाप्य भजन किर्तन करतात दशमीच्या दिवशी व्रतांचे पारणे करतात हे व्रत केल्याने सर्व पापे नष्ट होऊन अंती उत्तम लोकांची प्राप्ती होते असे सांगितले आहे.
चैत्र पौर्णिमा - चैत्र माहिन्याच्या शुध्द पक्षाच्या १५ व्या दिवसाला चैत्र पौर्णिमा म्हणतात. त्या दिवशी श्रीराम भक्त हनुमानाचा जन्म सुर्यादयाचे वेळी झाला, त्यावेळी यथासांग हनुमान जन्मोत्सव साजरा करतात.
२) वैशाख
शालिवाहन शक कालगणनेप्रमाणे वैशाख हा दुसरा माहिना.
अक्षयतृतीया - वैशाख शुध्द तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. जिला क्षय नाही म्हणजे अक्षय आहे ती तृतीया. या तिथीस केलेले दान व हवन लयाला जात नाही.
वर्षातले साडेतीन मुहुर्तांपैकी अर्धा मुहर्त दिवस. कृतयुगाचा हा शुभारंभाचा दिवस आहे. परशुरामाचा जन्म याच दिवशी झाला.
स्त्रियांना हा दिवस महत्वाचा असतो. चैत्र शुध्द तृतीयेला माहेरी आलेली गौरी या दिवशी सासरी जाते. तेव्हा त्या दिवशी गोड -धोडाचे जेवण करुन सवाष्ण घालतात. सुवासिनी हळदी कुंकवाला जातात - येतात. गौरीला निरोप देण्याचा हा कुलाचार आहे.
३) जेष्ट
शालिवाहन शक कालगणेप्रमाणे जेष्ट हा तिसरा माहिना.
वटपौर्णिमा - जेष्ठ शुध्द पक्षाच्या १५ व्या दिवसाला जेष्टी पौर्णिमा म्हणतात. भारतीय संस्कृतीमधील अखंड सौभाग्याचे मृर्तिमंत प्रतीक म्हणजे सावित्री. यमालाही तिच्या मागणी पुढे नमते घ्यावे लागले. सावित्रीने सत्यवानाचा निष्प्राण देह वडाच्या पानाने झाकुन ठेवला व तिने यमाकडुन सत्यवानाचे प्राण परत आणले आणि सत्यवान सजीव झाला. तो दिवस होता ज्येष्ठी पौर्णिमेचा त्या दिवशी सुवासिनी स्नान करुन वडाच्या झाडाला सुताचा दोर गुंडाळतात, त्याच्यापुढे आंबे, केळी ठेवुन त्याची पुजा करतात व उपवास करतात. वडाचे झाड न आढळल्यास वडाची फांदी आणुन त्याची पुजा करतात. भारतीय स्त्रियांमध्ये वटपौर्णिमा हा कुलाचार प्रासिध्द आहे.
४) आषाढ
शालिवाहन शक कालगणनेप्रमाणे आषाढ हा चवथा माहिना.
चार्तुमास - चार्तुमास म्हणजे आषाढ शुध्द एकादशी ते कार्तिक शुध्द दशमी या दरमान्यचा काळ. या काळात देव झोपी गेलेले असतात तेव्हा त्यांची ही रात्र होय. म्हणुन या काळात असुर, मानवांना त्रास देऊ लागतात. त्यासाठी मानव जागृत राहुन धार्मिक व्रतवैकल्ये करतात. कारण ते पुण्य असुरांचा त्रास नष्ट होण्यासाठीच शक्ती सारखे उपयुक्त ठरेल ही या मागची भावना आहे कार्तिकी एकादशीला देव झोपेतुन उठतात व त्यानंतर द्वादशीस पारणे करतात.
दिव्याची आवस -आषाढ वद्य १५ व्या दिवसाला आषाढ अमावस्या म्हणतात. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, वात, फुलवात, यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. प्राणाला प्राणज्योत म्हणतात, घरातील मुलांना वंशाचे दिवे म्हणतात, इतका हा दिप मानवाशी निगडीत झालेला आहे. दिप म्हणजे प्रकाश, तेज अंधार म्हणजे संकटे मानवाने तेजस्वी बनले पाहिजे म्हणजे संकटे आपसुकच नष्ट होतात, हा या दीप पुजेतील भावार्थ आहे सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याचवेळी दारिद्याची शुध्द देवता निघुन जाते अशी क्ल्पना आहे. आषाढी अमावस्येला घरोघरी दिव्यांचे पुजन करतात भोजनास धान्याच्या पीठाचे दिवे करतात. हा एक कुळधर्म आहे. अन त्याला दिव्याची आवस म्हणतात.
|