५) श्रावण
शालिवाहन शक कालगणनेप्रमाणे श्रावण हा पाचवा महिना. श्रावण महिना हा वेगवेगळ्या पूजांचा महिना आहे.
श्रावण सोमवार
या महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी दिवसभर उपवास करतात. सांयकाळी सूर्यास्तापुर्वी शंकराची पुजा करुन उपवास सो्डतात.
नागपंचमी
श्रावण शुध्द पंचमीला नागपंचमी म्हणतात शिवशंकराच्या गळ्यात ज्याला मानाचे स्थान प्राप्त झाले आणि भगवान श्री विष्णुचे सागरावर आसन झालेला आसा जो नाग त्याचा प्रमुख सख म्हणजे नागपंचमी या दिवशी पाटावर किंवा भितीवर हळदीने नागाच्या प्रातिमा काढुन त्याची सुवासिनी पुजा करतात हा कुलधर्म आणि कुळाचार आहे
नारळी पौर्णिमा - श्रावण शुध्द पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा म्हणतात. श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफल म्हणजे नारळ. लक्ष्मीला नारळ फार आवडतो म्हणुन याला श्रीफल असे मानाचे नाव प्राप्त झाले आहे. भारतीय संस्कृतीने नारळाला हिंदुधर्मीय मानलेले असल्याने तो फोडण्यापृर्वी त्याची शेंडी कधीही काढीत नाहीत देवापुढे नारळ ठेवण्याचा किंवा फोडण्याचा कुलाचार आहे. तांब्याच्या कलशावर आंब्याच्या पानामध्ये श्रीफल ठेवुन पुजा करतात. सुवासिनीची ओटी नारळाने भरतात अनेक शुभप्रसंगी नारळ वापरतात. कोकणात या दिवशी सागराला विधीपृर्वक नारळ अर्पण करतात तसेच, या दिवशी दैवाला महानैवद्यासाठी नारळी भाताचे पक्वान करतात व तेज भोजनात घेतात. हा एक कुलधर्म आहे, आपले संरक्षण भावाने करावे या भावनेने या दिवशी बहीन भावाला राखी बांधु लागल्या. ज्यांना भाऊ नसे त्या कुणाला तरी राखी भाऊ मानु लागल्या. यातुनच पुढे या पौर्णिमेला 'राखी पौर्णिमा' म्हणु लागले व बाहिणीने भावाच्या हातात राखी बांधण्याचा कुलाचार निर्माण झाला.
श्रावणी - जुने जानवे टाकुन नवीन जानवे घालणे, पुन्हा नव्याने अध्यनन करणे, हा श्रावणातल्या श्रवण नक्षत्रावर करावयाचा सांघिक स्वरुपाचा कुलाचार आहे. त्यावेळी वेगवेगळ्या देवतांचे पुजन होम - हवन विधी करतात. नागपंचमीला हस्त नक्षत्रावर ऋग्वेदी लोकांची नारळी पौर्णिमेला यजृर्वद्याची भाद्रपदात हस्त नक्षत्रावर सामवेद्यांची व भाद्रपद पौर्णिमेला अथर्ववेद्यांची श्रावणी असते.
कृष्णाष्टमी - श्रावण वद्य अष्टमीला कृष्णाष्टमी म्हणतात. या दिवशी मध्यरात्री रोहिणी नक्षत्रांवर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत कृष्णाचा जन्म झाला. म्हणुन त्या दिवशी जन्माष्टीचे व्रत करण्याची प्रथा पडली आहे. हे व्रत केल्याने संतती, संपत्ती व अंती वैकुंठ लोक याची प्राप्ती होते.
६) भाद्रपद
शालिवाहन शक कालगणनेप्रमाणे भाद्रपद हा सहावा माहिना.
हरीततालिका पुजन - चांगला वर मिळावा, अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी, घरातील सर्वांना आरोग्य व सुखसंपत्ती लाभावी व घराची भरभराट व्हावी आणि मृत्यु नंतर कैलास लोक मिळुन मुक्ती लाभावी. यासाठी भाद्रपद शुध्द तृतीयेला स्त्रियांनी शिवाची पुजा करण्याचा कुलाचार आहे्.
गौरीने शिव हा वर मिळावा यासाठी सांबाच्या पिंडीची जेथे पुजा केली ती गुन्हा हिमालयाच्या उत्तरेस असलेल्या गौर नावाच्या पर्वतवर आहे. येथे हरताल नावाच्या वृक्षाचे उपवन आहे गौरी त्याच्या सानिध्यात त्यावेळी राहत होती म्हणुन तिला 'हरितालिका' हे नाव पडलेले आहे.
गणेश चतुर्थी -भाद्रपद शुध्द चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मृर्तीची स्थापना व उत्सव. हा उत्सव घरोघरी रुढी प्रमाणे दीड, चार, सात, किंवा दहा दिवस होतो रोज गणपती पुजन, आरती, मंत्र, जागर करतात. व उरलेल्या दिवशी मृर्तीचे नदीत, सागरात किंवा विहीरीत विसर्जन करतात.
आविधवा नवमी - भाद्रपद वद्य नवमीला हे नाव आहे. स्वत:ची माता अथवा कुंटुबातील अन्य कोणी स्त्री अहेवपणी ( सधवा ) मृत झाली असल्यास त्या दिवशी तिचे श्राध्द करतात. ब्राह्मण भोजनाप्रमाणे सुवासिनीलाही भोजन घालण्याची प्रथा आहे.
महालय श्राध्द - भाद्रपद वद्य प्रातिपदा ते अमावस्येपर्यंत ज्या तिथीला वडील मृत झाले असतील त्या तिथीला पक्ष अथवा महालय श्राध्द करतात. यावेळी सर्व पितरांना पिंडदान व तर्पण करतात.
७)आश्विन
शालिवाहन कालगणे प्रमाणे आश्विन हा सातवा माहिना.
घटस्थापना - नवरात्र - घटस्थापना हा पार्वतीने घेतलेल्या दुर्गादेवी या अवतार देवीचा सण आहे. आश्विन शुध्द प्रातिपदा ते आश्विन शुध्द नवमी पर्यंत हे नवरात्र असते ही एक शक्ती पुजा आहे. रोज देवी पुढे झेंडुच्या फुलांची माळ सोडतात व अखंड नंदादिप तेवत ठेवतात. जशी रुढी असेल त्याप्रमाणे करतात मंगळवार, शुक्रवार व अष्टमीस सप्तशतीचा पाठ म्हणतात. रुढीप्रमाणे नवव्या दिवशी सांयकाळी किंवा दस-याच्या दिवशी नवरात्र उठविण्यात येते.
|