1   2   3
निराजनी देशु ।कुवार्ली तान्हुलिये॥९॥
ती चालुली बन्ने विस्तारा
अठरायि पारिची षडरस पक्वान्ने आणा
अठराये तिम्मणाये ।बाढ्ढित्ये ठायां
साळि डाळि बहुत सोसले दहि।
कुवार्ली तान्हुलिये॥१०॥
शिपिन्नोर्डि कोल्लार मुर्डि।तुं साळिणी तुं माळिणी
तुं कुंभारिणी तुं कोळिणी। तूं बाम्मणी तूं गुर्वीणी
तु आकाशिणी तुं पोयाणी तुज पतीस
चरण वंदु मी जोग्ळा देवी तुम्हाचे चरण ॥११॥
अंध ब्रेची दुर्गा देवी ।माहेळेंची आब्वै राणी
सोप्पारेंची गुणवंतीणी ।कैलासीची उमादेवी
कोल्हापुरची महालक्षुमी
त्याही ।चिप्पोळ्या हाक्कारि
मिळविल्या पांचे जणी ।विनावियास्थाना
कोझ्ये चाळिनली ये ।कोकणाभयान
श्रिये कोल्हापुरी ॥१२॥
महालक्ष्मी माउली ये तुझ्या प्रसादे झाली बोडणवेळ
याबा वैली ये बोडुणी खेलणेया।
जोगेश्वरी माउली ये ।तुम्हा प्रसादे झाली बोडणवेळ
या बावेलीये बोडुणी खेलणेया ।
वाघेश्वरी माउली ये तुम्हा प्रसादे झाली बोडणवेळ
याबा वैलीये बोडुणी खेलणेया
तुळजा माउलीये ।याबा वेळीये
करंजाये माउलीये ।याबा वेळीये
कमलाये माउलीये ।याबा वेळीये
रात्ताये माउलीये ।याबा वेळीये
सा-या (सावि) देवी माउल्याने तुम्ही।
याबा वेळीये ॥१३॥
कणे रणें द्र्व्यें रुद्राक्षें आणा।
जायी जुयी आनल्या सेंवंत्या मुचकुरै।
मनकमळी महालक्ष्मी पुजिया
मनकमळी महाकाळी पुजिया
मनकमळी जोगेश्वरी पुजिया
मनकमळी वाघेश्वरी पुजिया
मनकमळी तुळजायि पुजिया
मनकमळी केळायि पुजिया
मनकमळी कमळायि पुजिया
मनकमळी रात्तायी पुजिया
मनकमळी दुर्गायी पुजिया
मनकमळी सा-या (सावि) देवि पुजिया
सर्वण्या बसण्या दिज्जे तवं
गंध धुप दीप श्रीखंडा आधि लावुनी
सिस्थ यादि मृग या देकर वा
साळी देस्का सुरवर देस्का ।
पुजिया महाकाळी वरी माळ सामाये।
चौसष्टी योगिनी व्हा तुम्ही आनंदू करा
श्रिवे कोल्हापुरी ॥१४॥
पिंगारु बहु पिंगार पाणिये भरिया
आचमन्ने तांबुले सारिया । बहुकला देवियान्हो     Back