चित्पावनांच्या मुलस्थानासंबंधीही अनेक अपसमज आहेत. गौरवर्ण, निळसर घारे डोळे, रेखीव मुद्रा या लक्षणांवरुन त्यांचा ग्रीस अथवा इराण याच्यांशी संबध जोडण्यात आला. वास्ताविक यातील काही विशेषांनी संपन्न अशा भार्गव, नागर, कायस्थ अशा अन्य ज्ञाती होत्याच, परंतू राजकीय सोयीसाठी चित्तपावनांना उपरे, परकी आणि 'इराणी ब्राह्मण' (महात्मा फ़ुले यांचे मत) ठरविण्यात आले.
आता घा-या डोळ्यासंबधी. वंश शास्त्रज्ञाच्या मते ढगाळ वातावरणात निळसर घा-या डोळ्यांची प्रातिमा साधन (इमेज फ़ॉर्मेशन) आधिक सुलभतेने होते. युरोपमध्ये ते आतिरिक्त प्रमाणात असल्याने तेथील डोळे आधिक निळे, परंतु कोकणातील ढ्गाळ व कुंद वातावरणही अशा नेत्र -रंगप्रवृत्तीला आधिकाआधिक उत्तेजन मिळाले. कोकणात ते कोठुन आणि का आले याची चर्चा पुढ येईलच.
विस्तृत आणि भव्य चित्ती हा यज्ञाचा आवश्यक भाग नाही परतुं ती प्रशासनीय अशी यज्ञपुर्व प्राकिया आहे. या चित्ती अनेक आकारांच्या असतात काही सप्ताहापासुन एक संवत्सरपर्यंत त्यांचा अवधी असु शकतो, आणि काही शतसंख्य विटापासुन द्श सहस्त्र विटांपर्यंत त्यांची व्याप्ती असु शकते. त्यातील विटा पर्वकाळी मंत्रपुर्वक सिध्द केलेल्या, विविध आकृतीच्या आणि विशेष चिन्हांनी युक्त असतात. त्यातील काही यजमान, यजमान -पत्नी, प्रमुख ऋत्विज (पुरोहित) यांनी सिध्द करावयाच्या असतात. त्यांचे चयन (एकत्रीकरण) प्रभावी आणि इष्ट फ़लदायी व्हावे यासाठी अलौकिक सामर्थाने युक्त असे कित्येक वस्तुजात (त्या काळच्या समजुतीप्रमाणे ) त्यामध्ये मिसळावयाचे असतात. अर्थातच ही प्राक्रिया आतिशय पारिश्रमाची विशेष तंत्रज्ञानाची आणि सांघिक स्वरुपाची असते. जेव्हा सम्राट यज्ञकर्ता असतो तेव्हा साहजिकच चित्तीची शास्त्र शुध्दता, भव्यता आणि व्याप्ती विशेषच महत्त्वाची असते. हा उपक्रम सामान्य प्रकारचा नसल्यामुळे त्यासाठी विशेषज्ञ बाहेरुन आणले जाणेही संभवते.
कंदबाचे मांडलिकत्व बाजुला सारुन चालुक्य घराण्याचा सम्राट पाहिला पुलकेशी (सन ५३५ ते ५९६) याने आपले सार्वभौमत्व घोषित केले, तेव्हा परंपरेप्रमाणे अश्वमेघ आणि राजसुय हे यज्ञ करण्याची योग्यता त्याला प्राप्त झाली .वरील यज्ञ आणि आग्निष्टोम, वायपेय, बहुसुवर्ण आदी यज्ञ साजरे करुन त्याने पुण्य आणि किर्ती मिळविली असा गैरवापर उल्लेख सन ५४३ च्या कोरीव लेखात आहे.
या चयन-पुर्वक महायज्ञासाठी भुमी निवडायची ती विघ्न आणि विक्षेप यांपासुन सुरक्षित आप्तजनांची वस्ती असलेली, सहस्त्रवधी विटा सिध्द करण्यासाठी खाडीकाठ आणि पावित्र नदी संगम यांनी युक्त असलेली अशी असणे अवश्य होते. चिपळुणचा पारिसर या कामी अत्यंत सोयीचा होता. चालुक्याचे व्याही आणि सामंत अशा उभय संबंधाचे श्रीसेंद्रक घराणे त्या भागात नांदत होते. सह्याद्रीच्या संरक्षक भिंत होती, खाडीकाठ होता शिव आणि विशिष्टी या नद्यांचा संगम तेथे होता. चिपळुन या नावाची व्युत्पती चित्ती-पुलीन म्हणजे चैत्य किंवा चयन जिथे घडले. त्या नदी काठावरील स्थळ अशी सिध्द होते.
चित्ती प्रक्रिया जाणणारे ब्राह्मण मिळविणे ही सोपी गोष्ट नव्हती. ज्यांनी अनेक यज्ञाचे यजमानपद स्वत: केले असे याज्ञिकच सोमयज्ञात पौरोहित्य करु शकत. जिथे यज्ञसंस्था प्रदीर्घ काळ प्रस्थापित आहे अशा प्रदेशातुन हे चित्ती -प्रवण ब्राम्हण आणावे लागणार होते. सुदैवाने शेजारीच गुजराथचे मैत्रक राज घराणे यज्ञकर्तूत्वासाठी प्रसिध्द होते. कित्येक ताम्रपटांतुन त्यांनी केलेल्या महायागांचा गौरव उदघोषित झाला होता, त्यांनी वैदिकांची आणि याज्ञिकांची शतसंख्य कुळे गुजराथ काठेवाडमध्ये वसाविली होती. त्यांनी चिपळुन हे स्थळ जल मार्गाने आणि स्थलमार्गाने पोहोचण्यासारखे होते.
संशोधकांच्या मते (यात हिर्न्यूल आणि ग्रियर्सन हे प्रमुख आहेत) पाश्चिम किना-यावरील ज्ञाती काराकोरम पर्वत मार्गाने भारतात उतरलेल्या आर्य समुहापैकी आहेत. किनारपट्टीच्या अलगपणामुळे त्यांचा वर्ण भाषा-विशेष व राहणी हे प्रकार इतरांपासुन वेगळे राहिले. या संशोधनाला उत्खननातुन प्रबळ पुरावा मिळाला आहे. काराकोरम पलीकडे अगदी लागुनच सोमनगर या वस्तीचे असंख्य अवशेष मिळाले आहेत .काश्मिरात बौध्द धर्माचा प्रभाव वाढला शासक त्या धर्माचे आभिमानी झाले तेव्हा वैदिक पंरपरेच्या रक्षणासाठी ते पंजाब आणि राजस्थान या प्रदेशात उतरले. चौथ्या शतकात श्वेतहुणांच्या आक्रमणांनी संबंध उत्तर भारत असुरक्षित झाला तेव्हा ही ब्राम्हण आणि क्षात्रिय घराणी गुजराथमद्ये आली मैत्रक घराणे हे त्यापैकीच होय .त्याच्या या संक्रमणापुर्वी अजमीरजवळील लोहमार्ग (लोहारकोट) येथे विश्वजित यज्ञ मोठ्या प्रमाणात संपन्न झाला, त्याचे उल्लेख अनेक पुरानात आहे. या समुहातील अनेक घटक म्हणजे चित्पावन. याचा आश्चर्यकारक पुरावा राजस्थानातील खांडल ब्राह्मण आणि चित्पावन यांच्यातील पन्नास आडनावे तंतोतत सारखी असणे हा आहे. त्याची चर्चा पुढे येईलच. |