वरील कुलदेवतेशिवाय नाचण्याला करमरकरांच्या "नवलाई" व "पावलाई" दोन ग्रामदेवता व "जाखाई" ही राखण किंवा रक्षण देवता असुन त्यांना वर्षातुन पाच वेळा वर्षप्रातिपदा ( दिवाळी ), देव दिवाळी, कोजागिरी, पौणिमा नारळी, पौणिमा व फ़ाल्गुन पौणिमा या दिवशी नवैद्य दाखवयाची प्रथा आहे. मंगळवेढ्याच्या करमरकरांच्या घरात शुभकार्य झाल्यावर तुळजापुरच्या तुळजाभवानीच्या गोंधळ घालण्याची पध्दती आहे. नाचण्याचे करमरकर दररोजच्या जेवणाचा नैवेद्य" भवानी विश्वेश्वर प्रसन्न" म्हणुन दाखवितात. या ग्रामदेवताचे उत्सव (फ़ाल्गुन शुध्द पौणिमा) साजरे होतात, नवलाई पावलाईचा उत्सव फ़ाल्गुन शुध्द पंचमीपासुन सुरु होऊन वद्य पंचमीपर्यंत चालतो हा उत्सव सर्व गावकरी मिळुन करतात कारण नाचण्याचा ग्रामस्थांच्याही या ग्रामदेवता मानल्या जातात. पुर्वी या देवता सड्यावर स्थापन करण्यात आलेल्या होत्या व आजही तेथेच आहेत. त्यांच्या प्रातिकृति मात्र गावात स्थापविल्या आहेत व त्या करमरकरांनी दिलेल्या जागेत आहेत.
देवस्थानचे मानकरी पंचक्रोशीतील लोक याच्यांच देवताच्या पालखी - प्रसादाच्या मानावरुन मतभेद निर्माण झाले व सड्यावरच्या देवता या सांवत घराण्याच्या असुन इतरांचा तेथे काही संबंध नाही असे सावंत सांगु लागले त्यामुळे गावक-यानी सड्यावरील मांदिरात जाण्याचे सोडुन दिले, तेव्हा करमरकरांनी पुढाकार घेऊन आपल्या जागेतील काही भाग या देवांताच्या प्रातिकृती स्थापण्यासाठी तोडुन दिला अशी माहिती सांगतात. उत्सवाच्या दिवसात देवतांची पालखी प्रथम नाचण्याच्या पारिसरात फ़िरुन फ़ाल्गुन शुध्द पौणिमेला करमरकरांच्या वाड्यात येते तेथे खणा नारळांनी ओटी भरतात व दुपारी जेवणाचा नेवैद्य दाखवितात. रात्री गावच्या मैदानात पालखी खेळवतात पालखी खेळविण्यासाठी भोई असतात व काही हौशी भक्त पालखी आपल्या खाद्यावरही घेतात या देवता नवसाला पावतात अशी माहिती गावकरी देतात.
मागे आडी गावाच्या उल्लेख आला आहे हे रत्न्नागिरीपासुन सुमारे सहा सात किलो मीटर अंतरावर आहे. एस.टी.किंवा रिक्षा टॅक्सी करुन जाता येते कुटुंबियांची सहा सात नांदती घरे आहेत. इतर वस्ती कुणबी लोकांची आहे या घराजवळ लक्ष्मीकांतांचे हे मांड पंती देऊळ आहे, त्याचा उत्सव कार्तिक वद्य द्वादशीला असतो.सुमारे दोन फ़र्लांग अंतरावर ग्राम देवतेचे देऊळ आहे तिथे नाव "आदिष्टी". करमरकर कुटुंबियास चैत्र शुध्द प्रातिपदा (पाडवा) व मार्गशीष शुध्द प्रातिपदा( देव दिवाळी)या दिवशी जे नैवेद्य दाखविले जातात त्यात या दैवतेचा समावेश आहे नाचण्याचे करमरकर मात्र तेथील ग्राम देवता नवलाई पावलाई व जाखाई यांना वरील दोन दिवशी व शिवाय नारळी पौणिमा, शिमगी पौणिमा आणि दिवाळीचा पाडवा या तीन दिवशी नैवेद्य दाखवितात. आदिष्टी दैवता संबधी अशी आख्यायिका सांगतात कि या आडी गावी एक कासार बांगड्या विकण्यासाठी नेहमी येत असे एके दिवशी या देवालायावरुन तो जात असताना एका सुवासिनीने त्याचेकडुन चुडा भरुन घेतला. त्याचे पैसे मागितले असता ती म्हणाली "मी करमरकरांची माहेरवाशीण आहे त्यांचेकडुन बांगड्यांचे पैसे घे. " असे बोलुन ही सुवासिनी अंतर्धान पावली ही गोष्ट समजल्यावर करमरकरांनी या जागी हे देऊळ स्वखर्चाने बांधले या देवीस माहेरवाशीण म्हणुन मानाने आज ही दरवर्षी व लग्नकार्यात नैवेद्य दाखवुन सुवासिनीना बांगड्या दान करण्याची पध्दत आहे. प्रत्येक कुटुंबात कुळधर्म कुळाचारास फ़ार महत्त्व असते कुंटुबाच्या स्वास्थासाठी हे कुलधर्म कुळाचार न चुकता पाळावेत असा संकेत आहे. मंगळवेढाच्या करमरकरांत काही शुभकार्य झाल्यावर तुळजाभवानीच्या गोंधळ आल्याण्याची पध्दत आहे बोडण घालणे हा प्रकार सर्व करमरकरांच्या नाही,काही घराण्यात आहे.
तथापि वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक झालेली करमरकर मंडळी वरील कुळाचार कुळधर्माशिवाय इतरही काही कुळाचार पाळतात असे दिसते. कुळधर्म कुळाचार कटाक्षाने पाळावेत असे संत तुकारामांचे सांगणे आहे त्यांनी लिहिले आहे-
कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन
कुळधर्म निधान हाती चढे
कुळधर्म भक्ति कुळधर्म गाति
कुळधर्म विश्रांती पावतील
कुळधर्म दया कुळधर्म उपकार
कुळधर्म सार सांधनांचे
कुळधर्म महत्त्व कुळधर्म मान
कुळधर्म पावन परलोकांचे
तुका म्हणे कुळधर्म दावी देवी देव
यथाविधभाव जरी होय.
समर्थ रामदास स्वामिना कुळाधर्माचे फ़ार महत्त्व वाटे. ते म्हणतात, जाखामाता मायराणी बाळा बागुळा मानविणी पुजा मांगिणी जोगिणी कुळधर्म सोडु नये अनुक्रम उत्तम अथवा मध्यम करीत आहे.
भाक्तिचे एकंदर प्रकार नऊ, जिला आपण नवविधा भक्ती म्हणतो. त्यातली पाचवी भक्ती म्हणजे अर्चनभक्ती होय. अर्चन म्हणजे देवतार्चन. ज्याची देवता असेल तिचे त्याने पुजन करीत जावे याशिवाय जे जे कुळधर्म असतील तेही सर्व केलेच पाहिजेत.
समर्थ रामदास स्वामीची कुलस्वामिनी तुळजापुरची देवी तुळजाभवानी. तिच्या दर्शनास ज्यावेळी समर्थ प्रथम गेले त्यावेळी त्यांनी हर्षादगार काढ्ले-
देखोली तुळजामाता, निवालोअंतरीसुखे।
तुटली सर्वही चिंता थोर आधार वाटला" |