करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
            संप्रणाली
 
            माहितीचे मुद्दे
 
            संर्पकासाठी
 
चित्पावनांविषयी काही मते
 

१. A very frugal, pushing active, intelligent, well-taught astute, self confindent and overbaring class. The follow almost all callings and generally with success.(रत्न्नगिरी गॅझेटियर)
२ They are clean, neat, thrifty and orderly. (कोलाबा गॅझेटियर)
३. १८७२ मध्ये ठाणे जिल्ह्यात (ह्यात पनवेल, कर्जत समाविष्ट होते) २१३१७ ब्राह्मण व्यक्ती होत्या. एकुण लोकसंख्येच्या २.७८ टक्के इतकी ही संख्या होती. ८७२२ इतके कोकणस्थ ब्राह्मण होते त्यांना भटेला म्हणुन ओळखले जात. असे देशस्थ ब्राह्मण २००० च्या आसपास होते, पण मुरबाड, शहापुर ह्या भागात ते आजिबात नव्हते. कोकणस्थ ब्राह्मण रत्न्नागिरी जिल्ह्यात आले असुन बहुतेकांची घरे, शेतीवाडी कुलाबा व दक्षिण जिल्ह्यात आहेत. कोकणस्थ ब्राम्हणाची उंची बेताची पण सुद्ढ अंगकाठी असलेली, घारे डोळे, सतेज क्रांती, चेह-यावर बुधिमत्तेचे तेज. स्त्रियां चणीने लहान पण डोळे निस्तेज असलेल्या (बहुधा लाकडाच्या धुराशी बसुन आयुष्य काढल्यामुळे) पण नेटक्या आणि डौलदार. ह्या लोकांची राहणी नीटनेटकी स्वच्छ, काटकसरी. वागणुकीत सावधपणा व शिस्त. उपजिवेकेचा व्यवसाय शेती, लेखन, व्यापार आणि भिक्षांदेही (माधुकरी) सोळा संस्काराचे ते पालन करतात. जन्म, नामकरण, विवाह, आणि मृत्यु हे त्यातील प्रमुख. ते स्मार्त असुन शंकराचार्यांना मानतात. (ठाणे गॅझेटियर १८८२)
४. ते गोरे असतातच असे नाही पण उजळ असतात चेह-यावर विद्वतेची झाक असते. शे.१२ टक्के लोकांचे डोळे हिरवट असतात, किमान पिंगटपणा सर्वात असतात. डोळ्यात बुबुळ सामान्यत: चमकदार, कानाची पाळी सुटी असते. (डॉ.कर्वे आणि डॉ मलहोत्रा).
५. सर जॉर्ज वर्डवुड (१८३२-१९१७) ह्यांचे मत "कोकणाचा प्रदेश ही कोकणस्थाची निवासभुमी आणि वौदिक परंपरेची आश्रय भुमी आहे गंगातीरावरील ब्राह्मण या ज्ञातीला" 'चित्तेतुन पुनरुज्जीवित केलेली जात' असे मानतात, आणि तिला कनिष्ट समजतात. परंतु हा अनुदार उल्लेख उघड-उघड स्पर्धेतुन आणि असुयेतुन निर्माण झालेला आहे चित्पावन या नावाचा संबंध चितेशी जोडा व याचाच तर तो अवैदिक विचारांच्या भारतव्यापी वणव्यातुन मोठ्या चमत्काराने वाचलेली जमात असा का घेऊ नये?"
"चित्पावन या नावाची दंतकथात्मक व्युत्पती काहीही असो परंतु एक गोष्ट निर्विवाद की प्रमाणबध्द आकृती, गौरव पुर्ण घारे डोळे, प्रज्ञायुक्त चर्या यात्यांच्या विशेषांवरुन भारतीय आर्यांच्या उत्कृष्ट समुहातील ते एक घटक आहेत. त्यांची पौरुष पुर्ण राष्ट्रीय वृत्ती हीच तर पण स्वास्थशील अशा बंगाली बुध्दिवंतांपेक्षा पुर्णपणे निराळ्या प्रकारची आहे चित्पावनांचे स्वभाव विशेषच लक्षात घेता मोगल सत्तेच्या अपकर्ष-काळात ते कोकणातुन घाटावर आले आणि महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाचे अग्रणी झाले यात नवल ते काय? बौध्दिक कर्तृत्वाच्या अनेकविध क्षेत्रात आजही त्यांची नावे प्रथम श्रेणीत आढळतात. चित्पावन माहिला या तर सुंदरता, संस्कारिता आणि प्रभुत्वसंपन्नता यांच्या संगमाची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांच्या कुलीन सौंदर्यामध्ये कोमलता आणि निर्भयता यांचे असे काही मीलन आहे, की कोकणच्या आम्रवनात आणि नारळी वनात विहारासाठी आलेल्या त्या जणु ग्रीक रमणीच आहेत, असे वाटावे. नदीवरुन घागरीचे पाणी आणताना अथवा तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालतांना त्यांना पाहिले तर वरील विधानाची यथार्थता सहजच पटेल. त्यांची वस्त्रे बहुधा साधीच आणि अनेक रंगी कापडाची असतात पण प्रभात कालीन अथवा सांध्यकालीन तांबुस सोनेरी प्रकाशाच आधिकच तेजस्वी दिसणा-या या स्त्रीया एखाद्या टर्नर किंवा क्लॉडसारख्या विख्यात कलाकाराच्या चित्रकृतीत सहजपणे शोभुन दिसतील, अशा रुपसंपन्न असतात. त्यांचे बाह्यसौदर्य त्यांच्या आतिरिक्त प्रतिबिंब असते. त्या आदर्शकांता आणि आदर्श माता असतात. त्याग आणि भक्ती यांचा हिंदु परंपरेतील आदर्श त्याच्या वागण्यातुन प्रतीत होतो. मॉकोक्लिसारखे साहित्यकार आणि सेंटपॉल व सेंटऑगस्टिन सारखे तत्वज्ञ ज्याची सतत प्रशंसा करतात त्याच प्रतीचा हा थोर आदर्श आहे या सर्व प्रकारची गृहकृत्ये दक्षतेने पार पाडण्यात त्यांना धन्यता वाटते. घराबाहेर पडुन मिळणारी मान्यता त्यांचे चित्त विचालित करीत नाही. आपल्या अपत्यांच्या कल्याणासाठीच आविरत यत्न्नशील राहणे आणि पतीच्या आदराला सर्वथेव पात्र असणे यात त्या आपल्या जीवनाचा सर्वाच्च सन्मान समजतात"
(डॉ. द. वि. जोग ह्यांनी पाठविलेली माहिती)
(संदर्भ कर्वे कुलवृत्तांत)

 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+