करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
            संप्रणाली
 
            माहितीचे मुद्दे
 
            संर्पकासाठी
 
करमकरांची कुलदैवते, कुळधर्म इ.- 1  2   4  5  6  7           
 

करमकरांचे कुलदैवत "हरिहरेश्वर" कोकणातल्या कुलाबा- आता रायगड-जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात हरेश्वर या नावांचे लहान गांव आहे, श्रीवर्धनपासुन सोळा किलोमीटर अंतरावर हे गांव येते तेथेच हरिहरेश्वराचे देवालय आहे हे देवालय समुद्रकाठी असुन आतिशय रम्य असे स्थान आहे या देवस्थानाची स्थापना महामुनी अगस्ती ऋषींनी केली असे सांगतात. येथे ब्रह्मा, विष्णू, महेश, आणि पार्वती यांचा लिंग रुपाने वास आहे. इथे विष्णुपद असुन श्राध्दादि कर्म व पिंडदान करण्याचे कर्म करण्याची पुर्वापार पध्दत आहे प्रभु रामचंद्राचे या स्थानावर प्रेम होते व त्यांनी स्वत:च्या वडिलांचे श्राध्द विधीही तेथेच केले. या क्षेत्राचा इसवी सन १७१५ पासुनचा इतिहास उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज अनेकदा येथे दर्शनास येत असत. समर्थ रामदास स्वामीही हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन गेल्याचा उल्लेख आढळतो. या ठिकाणी चंदनाची महापुजा बांधतात या देवस्थानाला पेशव्यांचे कुलदैवत हरिहरेश्वराचे. मुळ देवालये व पाय-या आवळीचे सुभेदार राजे चंद्र्राव मोरे यांनी बांधल्या. संभाजी राजे येथे दर्शनाला येत यात्रेकरुंना त्रास न होईल याची दक्षता घेत. या देवालयाचा जीर्णीध्दार थोरले बाजीराव साहेबांनी १७२३ मधे केला. हे दक्षिण काशी क्षेत्र समजले जाते येथे अनेकांच्या पीडा निवारण झाल्याच्या नोंदी. पेशवे दप्तरात आहेत श्रींमंत माधवरावसाहेब पेशवे आजारपणात ओरडच. त्याचे क्लेश श्री हरिहरेश्वराच्या प्रसादाने थांबले. पेशवे कुळातील स्त्री पुरुष व अनेक सरदार मंडळी हरिहरेश्वराच्या दर्शनाला नेहमी येत व खुप खर्च करत हरिहरेश्वर व श्रीवर्धन ही दोन्ही गावे मुंबईच्या दक्षिणेला बाणकोट खाडीच्या उत्तर तीरावर वसली आहेत या गावाचे देशमुखीचे हक्क भट घराण्याच्याकडे चार चालत आले होते.
देवालयाच्या तिन्ही बाजुंना तीन उंच डोंगर असुन हरिहर, हर्षणाचल व आनंदगिरी अशी नांवे आहेत. या तीन डोंगराच्या पायथ्याशी समुद्राच्या अथांग लाटा सतत आदळत असतात व हे दृश्य आतिशय विलोभनीय दिसते. श्री हरिहरेश्वराच्या समोरच कालभैरवाचे मंदिर आहे. कालभैरवाची फ़क्त दोनच देवालये भारतात आहे. तर एक काशीला व दुसरे हरेश्वर येथे. काल भैरवाला कौल लावायची पध्दत आहे. आपल्या आधिव्याधीचे निवारण होण्यासाठीच येथे दर्शनाला येणारे, पुजा-यामार्फ़त कौल लावतात. काल भैरवासमोर भुत पिशाच्यांना मुक्ती मिळते करणी ग्रहबाधा निवारण होतात असा येथील अनुभव आहे. हिंदुप्रमाणे मुसलमान ही येथे कौल लावायला येतात. श्री हरिहरेश्वराचा वार्षिक उत्सव महाशिवरात्री दिवशी (माघवद्य त्रयोदशी) साजरा होतो. ब-याच घरातुन कालभैरवाची प्रातिमा (फ़ोटो) दारासमोरच लावलेली असते. सकाळी उठल्याबरोबर फ़ोटोला नमस्कार करुन खालील श्लोक म्हणतात.
'नम: काशी निवासाय नमो दंडक वासिने
नमोऽनमो प्रबोधाय भैरवाय नमो नम:॥'
पेशव्याचे कुलदैवतही हरिहरेश्वर असल्याचा उल्लेख वर आला आहेच. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे आजारी असताना सौ. रमाबाई साहेब हरिहरेश्वराच्या दर्शनाला येऊन गेल्या असा ऎतिहासिक पत्रात उल्लेख आढळतो. ही यात्रा इ.स. १७६६ साली झाली बाळाजी विश्वनाथ श्रीवर्धनचे. श्रीवर्धनला पेशवे राहात होते ती जागा ओसाड असुन फ़क्त मुळ वास्तुच्या चौथरा शिल्लक आहे. पाहिले बाजीराव साहेब व चिमाजी आप्पा या जागेत बागडले ऎतिहासिक वास्तुंची अशी दुरावस्था पाहिल्यावर मन विषण्ण होते. तथापि स्वातंत्र्योतर काळात येथे सभागृह बांधण्यात आले असुन पेशवाईचे संस्थापक बाळाजी विश्वनाथ यांचा पुर्णकृति पुतळा उभारण्यात आला आहे .समर्थांनी म्हटले आहे - 'एव सकळांमध्ये थोर तो येकचि परमेश्वर तया मद्ये हरिहर होती जाती ॥'

  पुढे          
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+