कोकणातील रत्न्नागिरी जिल्ह्यातील नाचणे हे आम्हा करमरकर घराण्याचे मुळ गाव त्याच जिल्ह्यातील दुसरे एक गांव " आडी" हे ह्या करमरकर घराण्याचे आणखी एक मुळ गांव काहीच्या मते करमरकरांचे मुळ गाव " आडी" तेथुन काही घरांणे नाचण्याला राहायला गेली तथापि बहुतेक करमरकराचे मुळ गाव नाचणे .(प्रस्तुत लेखकांचे मुळ घराणे नाचण्याचे)
नाचणे या मुळगांवी असलेल्या करमरकर घराण्याची सध्या १४ वी पिढी चालू आहे. यावरुन सोळाव्या शतकापासून करमरकर घराणे नाचणे या गावी स्थायिक झाले असावे. आम्ही करमरकर - चित्तपावन कोकणस्थ ब्राह्मण आमचे गॊत्र - काश्यप -शाखा - आश्वलायन - प्रवर -आवत्सार . आम्ही भगवान शंकराचे उपासक , म्हणुन शैव ,- भस्मचर्चित कपाळावर आडवे गंध लावणारे आम्ही भगवान परशुरामाच्या कोकणभुमीचे पुत्र .आमचे कुलदैवत -श्री दैव हरिहरेश्वर ( पोस्ट हरिहरेश्वर तालूका श्रीवर्धन ,जिल्हा रायगड) आमची कुलस्वामीनी - देवी केळाईदेवी (केलांबिका किंवा केळबाय ) - जगन्माता पार्वतीचे हे एक रुप .(तिचे स्थान महे ,ता. डिचॊळी,गोवा राज्य )
वरील प्रत्येक गोष्टीचे आता विस्ताराने विश्लेषण करुया प्रथम गोत्रे कशी निर्माण झाली ते पाहू - भारद्वाज ऋषींच्या आश्रमात पंधरा शिष्य वेदाद्यायनासाठी राहिले होते भारद्वाज हे त्याकाळचे श्रेष्ट आचार्य. या शिष्यांची वेदविद्येची परीक्षा घेण्याचे भारद्वाज मुनीनी ठरविले या पंधरा शिष्यात एक अल्प मतीचा शिष्य होता त्याची परीक्षेची तयारी नव्हती त्या काळी लेखी परिक्षा नसत. पाठातरांची परीक्षा असे तेव्हा या अल्पमतीच्या शिष्या्ने चौदा शिष्यांना विष दिले त्यामूळे ते मृत झाले ही हकीकत भारद्वाजाना समजली. पण ते शांत राहिले. तशी ही सर्व ऋषी मंडळी स्वभाने तापटच, केव्हा शाप देतील याचा नेम नाही. त्या वेळचा शिष्य वर्ग सदाचार संपन्न. त्याचे वास्तव गुरुकुलात जीवन एकंदर कष्टदायक अभ्यास व गुरुसेवा या शिष्यांना सतत करावी लागते १२ वर्ष हा विध्यार्थी दशेचा काळ, त्यामुळे आचार्यांनाही शिष्या बद्दल आपलेपणा असायचाच शिवाय हे शिष्य मनो भावे गुरुची सेवा करणारे गुरुकडुन ज्ञानमय शरीर प्राप्त होते अशी समजुत. आचार्य किंवा गुरु आपल्या शिष्यांच्या उपनयन संस्कार करत असत. आचार्य व विद्यार्थि यांच्यात् अद्वैत निर्माण करणारा हा संस्कार, त्यामुळे अशी ऋषी किंवा आचार्य मंडळी शिष्यावर रागावत नसत. शिष्य ही गुरुंचा आदेश तंतोतत पाळत. (महाभारतातील धौम्य ऋषींची कथा बोलकी आहे. त्यांनी शेतात बांध घालायला आरुणी उपमन्यू या आपल्या शिष्याला सांगितले, पण पाण्याचा लोंढा थांबला नाही तेव्हा आरुणीने आपल्या शरीराचा बांध घालून पाणी अडविले).तेव्हा भारद्वाज ऋषी शांत राहिले यात नवल नाही शिष्यांना शिक्षा करायची ती आतिशय सौम्य असे आणि ती सुध्दा वेदपठणात उच्चारांत व्यातिक्रम झाला तरच, शिष्यांच्या गालावर चापटी मारायची एवढीच, असो.
त्या मृत्यू झालेल्या चौदा शिष्यांना आग्निसंस्कार करत असतांना भगवान परशुराम तेथे आले भारद्वाजांच्या अनुमतीने परशुरामांनी तिचेवर पाणी शिपडले व या १४ शिष्यांना जिवंत केले. सर्व शिष्यांना आपल्या बरोबर आपल्या मायभुमीत -कोकणात आणले. त्यामूळे १४ शिष्याच्या नांवाची कोकणस्थाची गोत्रे झाली. चित्तेवर पाणी शिपडुन ते जिवंत झाले म्हणुन चित्तपावन .या चित्तपावन शब्दाची आणखी एक अशी एक कथा आहे कि "चित्तेपासुन पावन केलेले हे चित्तपावन वेदशास्त्र संपन्न होते गाणित ज्योतिष व स्थापत्यशास्त्राचे ज्ञान होते, त्याच्या आधारे भरती आहोटीचे निरीक्षण करुन जामिनीची धुप थांबवुन व बांध घालून जमीन सुपीक केल्या. डोंगर काठाची जमीन भाजुन व नांगरुन त्यातून ते भाताचे पीक काढु लागले क्षिती म्हणजे जमीन ती भाजून पावन करणारे ते चित्तपावन.खोत मंडळीत या चित्तपावन बाह्मण मंड्ळीचा भरणा आहे समुद्रकाठची सुपीक जामिन हे चित्तपावन बाह्मण कुलवाडी - कुणबी याच्या मदतीने कसत पण त्यांचे संबंध अरे-तुरे असत तथापि शिवाशिवीचे नियम मात्र कडक असत". |