करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
            संप्रणाली
 
            माहितीचे मुद्दे
 
            संर्पकासाठी
 
चित्पावन ब्राह्मणांची वैशिट्यपुर्ण व्रते 1   2           
       

बोडण, महालक्ष्मी, देवदीपावलीचे नैवेद्य ही चित्पावनाची वैशिष्टपुर्ण व्रते आहेत. ह्या व्रताची पुरेशी माहिती कुलबंधु -भागिनीना व्हावी म्हणुन गोखले कुलवृत्तांतात आलेला लेख थोड्याफ़ार फ़रकाने पुनर्मुद्रित केला आहे. बोडणाचे चित्तपावनी बोलीतील गाणे हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होउ शकेल. बोडणाची रांगोळी माहिला-भागिनींनी काढुन बघायला हरकत नाही. देवदीपावलीत दाखवयाच्या नैवेद्यांवरुन कुटुंबाचे कालमानाने झालेले स्थलांतर प्रवास समजु शकतो. दोन घराण्यांतील फ़रकही ह्या नैवेद्यांवरुनही स्पष्ट होतो. नवीन पिढीला ह्या तीनही व्रतांची माहिती असावी हा हेतु.
बॊडण
बोडण हा शब्द 'वर्धन' ह्या शब्दापासुन बनलेला आहे. आपल्या कुटुंबात वॄध्दी झाल्यानंतर बोडण भरतात. घरात गाय व्यायली असतानही काही कुटुंबात बोडण भरण्याची चाल आहे. काही मोठ्या कुटुंबांतुन प्रातिवर्षी (दस-यानंतर अगर दीपावली नंतर) बोडण भरतात. गौरीहराच्या वेळी पुजिलेली देवी अन्नपुर्णा (पार्वती) नववधु आपल्याबरोबर पातिगृही नेते. ही देवी कुलवधुवर कृपादृष्टी ठेवुन तिची संकटे निवारण करते व तिचा संसार वाढीस लावते म्हणुन तिच्यापासुनच वंशवृध्दी झाली म्हणजे त्याची सांगता करण्यासाठी बोडण भरण्याची चाल पडली आहे.
घरची मुख्य सुवासिनी स्त्री किंवा नववधु कुटुंबा बाहेरच्या तीन पुत्र व तीन पुत्रवती सुवासिनी व एक कुमारिका अशा पाच स्त्रियांनी मिळुन बोडण भरावयाचे असते. सुवासिनी घरी आल्यावर तुळशी वृंदावनाजवळ उभ्या करुन तुळशीची पुजा करण्यात येते. नंतर सुवासिनी व कुमारिका यांच्या पायावर दुध-पाणी घालुन व औक्षण करुन स्वागत केले जाते. ह्या विधीच्या वेळी आणखी एक जादा सुवासिनी स्त्री साहाय्यक म्हणुन निराळी बोलाविली जाते. प्रथम गाईच्या शेणाने जागा सारवुन त्यावर बोडणाची रांगोळी घालुन (बोडणाच्या रांगोळीचे चित्र सोबत) त्यावर पाट ठेवतात. पाटावर अक्षता ठेवुन त्यावर परात ठेवतात प्रथम अन्नपुर्णीची पंचामृती पुजा करतात घरची मुख्य सुवासिनी देवीस बसण्यासाठी व टेकण्यासाठी कणकेची बैठक व लोड (पाटावर - वरवंटा) तयार करुन परातीत ठेवतात व त्यावर देवीची स्थापना करतात. तिला कणकेचेच अंलकार वाहतात ह्याला देवीचे लेणे असे म्हणतात. नंतर गणपतीची व देवीची मुर्ती ताम्हनात घेऊन पंचामृती पुजा करुन तिला सहा नैवेद्य अर्पण करतात. नैवेद्य पुरणाचे करतात तसेच तळण ही असावे लागते (भजी, वडे वगैर) त्यावेळी पाच नैवेद्य देवीपुढे परातीत ठेवतात व एक नैवेद्य परातीबाहेर दखविला जातो. ह नैवेद्य कुमारिकाने भोजनास घ्यावयाचा असतो. नैवेद्यानं तर कणकेचे बनाविलेले पाच दिवे लावुन सुवासिनी व कुमारिका देवीची पुजा करुन भंडारा वाहतात व देवीची आरती करतात. भंडारा कणकेची दोन तीन इचं वर्तुळाची चकती करुन त्यात हळद घालुन नंतर बाजु मुरडुन तयार करतात. हे पाच दिवे पुर्वी परातीत ठेवलेल्या पाच नैवेद्याच्या पानावर ठेवले जातात. नंतर प्रत्येक सुवासिनी व कुमारिका परातीत ओंजळ धरते. त्या ओंजळीवर घरची सुवासिनी पंचामृत घालते त्यानंतर इतर सुवासिनी घालतात. मग ओंजळीतील दुध सुवासिनी दिव्यावर सोडतात. परातीत एकत्र बोडण म्हणुन कालवितात व देवी तृत्प झालीस का?(धायलीस का?) असे त्यातील कुमारिकेस विचारतात व तिने होय म्हणेपर्यंत त्यात आणखी दुध - दही घालुन बोडण कालवतात घरच्या सुवासिनीने पुर्व दिशेला तोंड करुन पुजेस बसावे कुमारिकेस तिच्या उजव्या बाजुस बसवावे. देवी तृप्त झाल्यानंतर त्या बोडणाचा काही भाग प्रसाद म्हणुन कुमारिकेच्या हाताने कुटुंबियातील सर्व मंडळीस अंगारा म्हणुन लावतात. नंतर बोडणातील देवी बाहेर काढुन स्वच्छ धुऊन पुसुन तिच्या तोंडास साखर लावुन ती परत घरच्या देवात आपल्या जागी ठेवुन देतात. नंतर कालविलेल्या बोडणाचा कोणताही भाग अपावित्र ठिकाणी पडु नये म्हणुन सुवासिनी आपले हात त्याच परातीत हाताला पुरणलावुण स्वच्छ धुतात व नंतर ते सर्व गाईस घालतात, अगर वाहत्या पाण्यात विर्सजन करतात. (सदर तीर्थ गाभण गाईस घालत नाहीत) नंतर निमंत्रित सुवासिनीची ओटी भरुन सर्व मंडळी भोजनास बसतात गर्भवती स्त्रीने या विधीत कोणताही भाग घ्यायचा नसतो. चैत्र माहिन्यात पौषात व चार्तुमासात हरकत नाही स्त्री देवीच्या कृपेने वंशवृध्दी होउन कुटुंबाची वाढ झाली त्या प्रित्यर्थ तिचे पुजन करुन संतुष्ट करणे हा ह्या कुलचाराचा हेतु आहे.
दक्षिण कानडा जिल्ह्यातील मुंडाजे वगैर ठिकाणी बोडण भरण्याच्या वेळी बोडण्याचे गाणे सुस्वर आवाजात म्हणण्यात येते. जर्मनीमद्ये 'वोडण' नावाच्या देवतेस भजतात. ही ट्युटॉनिक देवता आहे .स्वास्तिक हे तिचे चिन्ह आहे बोडण आणि वोडण यात उच्चारतादाम्य आहे. जर्मन लोकांची ही देवता आहे. ह्या बोडणाच्या कुलाचारावरुन डॉक्टर आंबेडकर यांनी एक खटला जिंकल्याचे समजते.
नैवेद्य १) भक्ष्य: लाडु, पोळी वगैर २) भाज्य: गुळभात, खिचडी वगैर ३) लेह्य : पंचामृत, लोणचे, मिरची वगैर ४) चोष्य : चाखुन खाता येतील असे पदार्थ ५) पेय : दुध किंवा तत्सम द्रव पदार्थ असावे. तुळशीपत्र ठेवुनच नैवेद्य अर्पण करावा.

      पुढे       
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+