करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
            संप्रणाली
 
            माहितीचे मुद्दे
 
           संर्पकासाठी
 
देवदिपावली 1    2          

चित्पावन ब्राह्मणांव्यातिरिक्त मार्गशीर्ष शुध्द प्रातिपदेचे महत्त्व अन्य कोणास नाही. 'मासानम् मार्गशिर्षोऽहम्।' असे भगवान श्रीकृष्णांनी गीता १०-३५ मध्ये सांगीतले आहे. सर्व मासांत 'मार्गशिर्ष' मास हा श्रष्ठ. त्यास 'विष्णुमास' असेही म्हणतात. एकेकाळी मार्गशिर्ष मासाने वर्षारंभ होत असे. ह्या माहिन्याच्या आरंभीच्या दिवशी म्हणजे शुध्द प्रातिपदेस देवदिपावली असे नाव आहे. त्या दिवशी सर्व चित्पावन ब्राह्मण आपल्या कुलदेवता, ग्रामदेवता, स्थलांतरीय, इष्टदेवता व उपास्य देवतांना महानैवेद्य अर्पण करण्याचा कुलाचार पाळतात त्यास 'नैवेद्य घालणे' असे म्हणतात. मुख्य देवतांचे नैवेद्य स्वतंत्र पानावर व एका गावातील देवतांना, एका पानावर त्यांच्या संख्येइतक्या भाताच्या मुदा व पक्वाने वाढुन हे नैवेद्य मांडतात. ह्यासाठी वडे व घारगे (भोपळ्याचे गोड वडे )हे मुख्य पक्वान्न करतात सर्व देवताना एकाच वेळी नैवेद्य दाखविण्यात येतो कुलदेवताचा नैवेद्य घरात घेतात .शंकराचा नैवेद्य व इतर ग्रामदेवताचे नैवेद्य बहुद्या गाईस घालतात किंवा गुरवास अगर गोरगारिबास देतात. देवदिवाळीस जमले नाही तर सोयीच्या अशा दुस-या कोणत्याही दिवशी हे नैवेद्य घालतात.
ह्या कुलाचारामुळे आपणांस आपला कुलस्वामी, कुलदेवता व ग्रामदेवता यांचे स्मरण होते, आपला मुळ गाव आठवतो, त्यानंतर आपल्या घराण्यातील मंडळीचे स्थलांतर कोठे व कस कसे होत होत गेले याचा बोध होता, वर्षातुन एकदा या नैवेद्य सर्मपणाचा निमीत्ताने ही आठवण जागृत ठेवणे हा या कुलाचाराचा हेतु आहे.
श्री महालक्ष्मीचे व्रत
विवाहापासुनची पाहिली पाच वर्षेपर्यंत नववधुने हे व्रत पाळावयाचे असते. आश्विन शुध्द अष्टमीस सकाळी प्रथम खंडाच्या देवीची पुजा करतात. खड्यांची संख्या आपआपल्या विवाहवर्षाप्रमाणे १ ते ५ पर्यंत घ्यायवची. पुजेच्या वेळी दुर्वांचा एक तंतु. १६ गाठीचा एक व दुसरा तंतु रेशमाचा घेतात. रेशमाच्या तंतुस विवाहवर्षाच्या संख्येप्रमाणे तितक्या गाठी मारायच्या असतात. खड्यांच्या देवी बरोबर या दोन्हीही तंतुची पुजा करतात. पुजेनंतर रेशमी तंतु मनगटात बांधतात. दुपारी तांदुळाच्या उकडीच्या देवीचा मुखवटा बनवुन तो एका कणकीच्या तोंडावर बसवुन श्री महालक्ष्मीची स्थापना करतात. ह्या देवी पुढे सकाळी पुजिलेल्या खड्यांच्या देवी व दुर्वाचा तंतु ठेवतात. सायकांळी श्री देवीस मुर्तीचा आकार देऊन ती वस्त्र व अंलकार घालुन सजवितात. नंतर देवीची पुजा अर्चा करुन आरती करतात. आरतीनंतर घागरी फ़ुंकण्याचा कार्यक्रम सुरु करतात. घागर फ़ुंकण्यामुळे त्यात प्राण संचार होऊन देवीस चेतन होते असे समजतात त्यावेळी काही स्त्रीयांच्या अंगात श्रीदेवीचा प्रादुर्भाव होते व त्या घुमु लागतात. त्यावॆळी तेथे जमलेल्या सुवासिनीपैकी कोणी आपआपले प्रश्न विचारुन श्रीदेवीस कौल घेतात. घागरी फ़ुंकण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर पहाटे देवीची आरती केली जाते व नंतर मनगटातील रेशमी तंतु देवीस वाहुन हा विधी संपतो.
या प्रमाणे ही महालक्ष्मीची पुजा वर्षात एकुण चार वेळा करावी लागते. प्रथम आश्विन शुध्द अष्टमीस (नवरात्रात) वरीलप्रमाणे ती केली जाते. दुसरी पुजा आश्विन शुध्द १४, तिसरी पुजा आश्विन वद्य ८ व चौथी पुजा आश्विन वद्य १४ या दिवशी आपल्या घरीच करावयाची असते. त्यावेळी देवीच्या मुर्तीची पुजा न करता दुर्वेचा तंतु, १६ कांडी असलेला घेऊन त्याचीच पुजा 'श्री महालक्ष्मीची पुजा' म्हणुन करावयाची असते. याप्रमाणे विवाहपासुनची पाहिली पाच वर्ष हे व्रत नुतन सुवासिनींनी पाळावयाचे असते.
काही कुटुंबातुन श्री महालक्ष्मीची पुजा आपल्या घरी करीत नाहीत. अशा वेळी ज्या ठिकाणी ही पुजा केली जाते त्या ठिकाणी स्वत: जाऊन ही पुजा करावयाची असते. त्यास निमंत्रणाची आवश्यकता नसते, पुजेचे सर्व साहित्य व दक्षिणाबरोबर न्यावयाची असते व दुपारचे भोजन ही त्याच घरी करतात म्हणुन त्यासाठी आपल्या घरचा शिधा ही न्यावा लागतो. गर्भवती स्त्रीने ह्या पुजनात सभाहग घ्यावयाचा नसतो. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने नववधुस व तिच्या कुटुंबास ऎश्वर्य लाभावे यासाठी तिची उपासना करणे हा या कुलाचाराचा हेतु आहे. बोडण, देवदिपावली व महालक्ष्मी पुजन हे तिन्ही कुलाचार पाळणे हे चित्पावन ब्राह्मणाचे वौशिष्टे आहे. या कुलाचाराच्या संदर्भात डॉ. सौ. इरावती कर्वे ह्यांचे मत विचारात घेण्यासारखे आहे, त्या लिहितात :
'Both 'बोडण' in honouer of श्री पार्वती and श्री महालक्ष्मी पुजा in honour of Shri Laxmi rituals seem to be the counterpart of AStare or Ishtar of the Babyloisns. The Worship of Mahalaxmi has many parts of resemblance to the ancient ritual of the Aztecs of America.'
चित्पावनांव्यातिरिक्त इतर ब्राह्मण जातीत वरील कुलाचार नाहीत ही गोष्ट लक्षणीय आहे.

मागे    
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+