करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
        संप्रणाली
 
        माहितीचे मुद्दे
 
        संर्पकासाठी
 
माहिनावार काही सण व कुलाचाराची माहिती. 1  2  3          
 

महालक्ष्मी पुजन
आश्विन शुध्द अष्टमीस महालक्ष्मी पुजन. याचे वर्णन आगोदर केले आहे.
दसरा - अश्विन शुध्द दशमीस दसरा किंवा विजया दशमी म्हणतात. वर्षातल्या साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त दिवस. ग्रंथ, शस्त्रे, यंत्रे, अवजारे, वाहने इ. विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणुन त्याची पुजा करण्यचा कुलाचार आहे. तसेच् शमी पुजनाची चाल आहे. सायंकाळी सीमा उल्लोंघन करुन आल्यावर पुरुषांना सुवासिनी ओवाळतात. सोन्याचे प्रतीक म्हणुन आपट्याची पाने दिली जातात.
कोजगिरी - अश्विन शुध्द १५ व्या दिवसाला कोजगिरी पौर्णिमा म्हणतात. हे एक व्रत आहे. रात्री लक्षी व ऐरातावर बसलेल्या इंद्र याची पुजा करतात.उपोषण, पुजन व जागरण या तिन्ही अंगाना या व्रतात सारखेच महत्व आहे. रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवितात.रात्री जागरण व खेळ खेळतात.
दीपावली - दिवाळी - काही काही सण भारतीयांच्या रोमरोमात इतके एकरुन झालेले आहेत की ते आपले कुलाचार किंवा कुळधर्म आहेत हे ही अनेकांना ठाऊक नसते. शिवाय प्रत्येक घराघरातुन असे सण साजरे केले जात असल्याने त्या कुलाचाराला किंवा सणांना सामाजिक सणांचे किंवा उत्सवाचे स्वरुप प्राप्त झालेले आहे.
दीपावली- दीवाळी हा अशापैकीच एक भारतीयांचा मोठा सण आहे. दीपावली म्हणजे दीव्यांची ओळ - अशा अनेक ओळी घराघरातुन या वेळी लावल्या जातात. म्हणुन या सणाला दीवाळी असे म्हणतात. सणाची सुरुवात आश्विन वद्य १२ पासुन होते तो दिवस वसुबारास, आश्विन वद्य १३ धनत्रयोदशी व आश्विन वद्य १४ नरक चतुर्दशी आश्विन वद्य अमावस्या लक्ष्मीपुजन.
८) कार्तिक
शालिवाहन शके कालगणनेप्रमाणे हा आठवा माहिना.
कार्तिक शुध्द प्रातिपदा -बली प्रातिपदा या दिवासाला दीवाळी पाडवा म्हणतात. वर्षातले साडेतीन मुहुर्तापैकी एक मुर्हत दिवस.
कार्तिक शुध्द द्वितीया -भाऊबीज हा सणाचा शेवटचा दिवस
कार्तिक शुध्द एकादशी- हा चातुर्मासाचा शेवटचा दिवस.
कार्तिक शुध्द द्वादशी-तुळशी विवाह- विवाहमुहुर्त सुरु होतात.
कार्तिक शुध्द चतुर्दशी - वैकुठ चतुर्दशी - हरि-हर या दोन देवांच्या भेटीचा दिवस मानतात. हे एक व्रत आहे. प्रथम विष्णुची पुजा नंतर शंकराची पुजा करतात. पुजा विधीनंतर नाममंत्राने प्रत्येक देवाला सहस्त्रकमळे वाहणे हे या पुजेचे वौशिष्टे आहे. या दिवशी उपवास करतात, शैव -वैष्णवातला विरोध शमविण्यासाठी या व्रताची योजना असावी वाटते.
त्रिपुरी पौर्णिमा -कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरी पौणिमा म्हणतात. या दिवशी शिवाच्या उपस्थितीत आदिशक्तीने म्हणजे त्रिपुरा देवीने त्रिपुर नावाच्या दैत्याला ठार मारले. त्यावेळी शिवालयातिल दीप माळेवर आणि घरापुढे दिवे लावले. तेव्हापासुन या उत्सवाला त्रिपुर उत्सव म्हणतात. कोकणात पुष्कळ कुलदैवताचा उत्सव या दिवशी असतो.
९) मार्गशीष
शालिवाहन कालगणनेप्रमाणे मार्गशीष नववा माहिना.
देवदिवाळी - भगवंतांनी विभुती योगामध्ये मी मार्गशीष मास आहे असे सांगितले तेव्हा या माहिन्याचा पाहिल्या दिवशी म्हणजे मार्गशीष शुध्द प्रातिपदेला सर्व देवांनी दीपोत्सव साजरा केला. म्हणुन या दिवसाला देवदिवाळी म्हणतात. या दिवशी देवांना पंचामृत स्नान घालतात. पक्वान्नांच्या महाप्रसादाचा नैवेद्य सर्मपण करतात. दिवे लावतात. वार्षिक नैवेद्य - या दिवशी सर्व कुलदैवतांच्या बरोबर इतर उपास्य देवतांना ही वडे - घारग्याचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. काही कुटुंबात अशी नैवेद्याची संख्या १५-२० पर्यंतही आहे, त्या घराण्यातील प्रथे प्रमाणे हा कुलाचार चालु आहे. याचा उगम केव्हा झाला हे मात्र माहित नाही.
१०) पौष
शालिवाहन शक कालगणनेप्रमाणे पौष हा दहावा माहिना
मकर संक्रांत - सुर्य एका राशीतुन दुस-या राशीत संक्रमण करतो त्याला संक्राती म्हणतात. पौष माहिन्यात सुर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणुन ती मकर संक्रात होय. ती जुन्या पंचांगप्रमाणे १४ जानेवारी व टिळक पंचागा प्रमाणे १० जानेवारीस येते. हा दिवस पुण्यकारक मानलेला आहे. त्या दिवशी स्नेहाचे प्रतीक म्हणुन तिळगुळ वाटण्यात येतो. मकर संक्रातीच्या कुलाचार तीन दिवसांचा असतो. पाहिल्या संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी - दुसरा संक्रांत - तिसरा किंक्रांत.
११) माघ
शालिवाहन शक कालगणनेप्रमाणे माघ हा अकरावा माहिना.
रथसप्तमी- माघ शुध्द सप्तमीला रथ सप्तमी म्हणतात. रथ हे वैदिक हिंदु धर्मातील प्राचीन वाहन आहे. सप्तअश्व असलेल्या रथातुन सुर्यनारायणाचे सतत भ्रमण चालु असते. सुर्यानारायणाची त्या रथासह रांगोळीने प्रातिमा काढुन पुजा करतात व गोव-यांचा विस्तवावर मातीच्या बोळक्यात दुध तापवितात. दुध उतु गेले म्हणजे ते सुर्यनारायणानी सेवन केले अशी भावना आहे. कुटुंबातील सर्वांची शरीरे, आत्मा, बुध्दी आणि मन तेजस्वी ठेवावे यासाठी सुर्यनारायणाची पुजा प्रार्थना करण्याचा दिवस म्हणजे रथ सप्तमी.
महाशिवरात्र - माघ चतुर्दशी या दिवसाला महाशिवरात्र म्हणतात. महाशिवरात्रीचा उपवास व त्या अनुषंगाने शंकराची पुजा - दर्शन हा एक कुळाचारच आहे त्या दिवशी शंकराला बेलाची पाने, आंब्यांचा मोहोर आणि धोत-याची फ़ुले अगत्याने वाहतात.
१२) फ़ाल्गुन
शालिवाहन कालगणनेप्रमाणे फ़ाल्गुन हा बारीक माहिना.
होळी पौर्णिमा - फ़ाल्गुन शुध्द १५ व्या दिवसाला होळी पौर्णिमा म्हणतात. होळी हा लोकोत्सव आहे त्याला शिमगा असेही म्हणतात. या दिवशी सांयकाळी शास्रपुत मार्गाने होळी पेटवुन तिची पुजा करतात व तिला पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण करतात. त्यावेळी 'बोंबा' मारण्याची चाल होती. आता ती शहरी भागातुन कमी होत चालली आहे. होळी एक कुळधर्म आहे.
रंगपंचमी- फ़ाल्गुन पौर्णिमेली होळीचा उत्सव सुरु होतो व फ़ाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी म्हणतात. पाण्यात केशर घालुन ते पाणी देवपुजेनतर देवाचे अंगावर उडविण्याचा कुळधर्म काहीच्याकडे आहे.
(संदर्भ देवधर दीक्षित ढमढेरे कुलवृत्तांतावरुन.)

मागे  
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+