करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवत
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
        संप्रणाली
 
        माहितीचे मुद्दे
 
        संर्पकासाठी
 
करमकरांची कुलदैवते, कुळधर्म इ.- 1  2  3  4  5  6  7           

     परतुं त्याआधी चालुक्यांनी चिपळुन ही यज्ञभुमी निवडली व यज्ञानंतर विस्तृत असे भुखंड देऊन तेथे या चितीप्रवण पुरोहितीची वसाहत केली हे सिध्द करणारी प्रमाणे सांगितली पाहिजेत. अर्थात त्या काळचे पुरावे म्हणजे ताम्रपट ते पुष्कळसे नष्ट झालेले ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे परंतु सुदैवाने त्या घराण्यातील दुसरा पुलकेशी (सन ६०२ ते ६४२) याने दिलेला ताम्रपट मुद्रित स्वरुपात उपलब्ध ( 'एपिग्राफ़िया इंडिका', खंड ३, पुष्टे ५० ते ५३.) संस्कृत भाषा आणि कानडी लिपी असणारा ताम्रपट दानाविषयक आहे. प्रासिध्द संशोधक भगवानलाल इंद्रजी यांना हा ताम्रपट चिपळुन येथे सन १८८४ मध्ये मिळाला. तापवुन स्वच्छ करण्याच्या खटपटीत त्यातील कालविषयक उल्लेख आधीच नष्ट झाला होता. तरी ही त्याच्या विश्वसनीयतेसंबधी शंका नसल्याने फ़्लीट या इंग्रज विद्वानाने त्याचे एशियाटिक सोसायटी पुढे वाचन केले.
     आपला मामा सेनानंदराज श्रीसेंद्रक याने केलेल्या भुमिदानाला मान्यता देणारा हा ताम्रपट आहे. दानाच्या स्विकार करणा-या महेश्वराच्या निर्दश आत्रिगोत्री चितळे यांचे असुन ते चिती या शब्दावरुन सिध्द होणारे आहे. या ताम्रपटाचा ओझरता उल्लेख भारताचार्य वैद्य आणि डॉ भांडारकर यांच्या ग्रंथात आहे. परंतु इष्टयज्ञ या उपाधीकडे त्यांचे लक्ष न गेल्यामुळे त्याचे व्यापक महत्व त्यांच्या ध्यानी आलेले दिसत नाही. श्रीसेंद्रक म्हणजे शिंदे असा त्यांचा आभिप्राय आहे. परंतु माझ्या मते चिपळुणजवळील कुटरे येथील राजे शिर्के म्हणजे श्रीसेंद्रक होता. मुसलमानी राजवटीत श्रीसेंद्रक यांचा संक्षेप शिर्क (श्रीकेवरुन) व्हावा हे साहजिकच होते. राजे शिर्के यांचे घराणे इंदुर - ग्वाल्हेरपर्यंतच्या प्राचीन आणि सन्माननीय मानले जाते. पाहिल्या पुलकेशीने चिपळुन येथे केलेल्या चितीयुक्त यज्ञाशी संबंधित अशा चितळे आणि शिर्के या घराण्याचा उल्लेख करणारा हा तांम्रपट या संदर्भात अत्यंत महत्त्वपुर्ण आहे.
     उपरोक्त तांम्रपटात सध्याच्या वाशिष्ठी नदीचा निर्दश चारुवेणी असा आहे, आणि तो आतिशय अन्वर्थक आहे. वेणी म्हणजे खाडी आणि ती आजही चारु म्हणजे रम्य दर्शन आहे. वेणी अथवा खाडीवरील आम्रवार हे दिलेले ... म्हणजेच चिपळुन ...पेढांबे (वेण्यांबे). ज्या दुस-या गावाच्या उल्लेख आहे ते आयांचपल्ली म्हणजे त्याच पारिसरातील चिवेली. अशा रितीने ताम्रपटातील ग्रामनामे आणि कुलनामे यांची साक्ष आणि सामक्ष चिपळुणच्या पुरातन यज्ञ प्रासिध्द प्रातिष्टेला अनुकुल आहे.
चिपळुनच्या यज्ञभुमित्वाच्या इतर खुणा म्हणजे यज्ञपती परशुरामाचे मांदिर, यज्ञात बोलिवलेले चारही वेद जिच्या रुपात पुन्हा समाविष्ट होतात ती वेदवासिनी अथवा विध्यवासिनी हिचे मंदीर आणि यज्ञभुमीचा रक्षणकर्ता अशी ज्याच्यी महती त्या कार्तिकेयाचे मांदिर ही प्रासिध्द मांदिरे होते. यज्ञानंतर यजमान, यजमान-पत्नी आणि यज्ञपुरोहित समारंभपुर्वक स्नान करतात. त्या अवभृथ स्नानाने पावित्र झालेले परशुरामातीर्थ अथवा रामतीर्थ आजही चिपळुणात आहे. चिपळुन नगराचे आजचे विभाग ही आपली यज्ञ संबाधित नावे सांभाळुन आहे: भोगाळे (मृगालय), मार्कडी (मार्कड्याचे स्थान) बेमंडी (ब्रह्मोदन मंडप), मिरजोळई (मर्जालीयम मंडप), पाग (प्राम्वंश मंडप), माप (विटाच्या भटीच्या जागा).वरील विभाग-नावे केवळ चिपळुणातच आढळतात, कोकणात अन्यत्र नाहित हे या संबधी लक्षात घेण्यासारखे आहे. नगराच्या मध्यभागी राष्ट्र्कुटांचे राज चिन्ह गजांत लक्ष्मी अत्यंत उपेक्षित अवस्थतेही आजही विद्यमान आहे.
     पंधराशे वर्षापुर्वी जेव्हा चित्तीसाहित सोमयज्ञ या भुमीत झाले तेव्हा आडनावे प्रचलित नव्हती, या आक्षेपाला धारण करीत. चित्पावनांच्या संबंधात ही कुलनामे यज्ञाविषयक कार्यावरुन रुढ झाली. अशी याज्ञीय कुलनामे युक्त प्रांतात आहेत. (यज्व,वाजपेयी तिवारी दीक्षीत ) तशीच ती आंध्रप्रदेशातही आहेत (उपद्रष्टा). महाराष्ट्रातील चित्पावने तर ज्ञातीतही ती आढळतात. श्रोत्रिय (श्रृति), नवरे ( नवरात्र इष्टी), सप्रे ( सप्तरात्र इष्टी), नवाथे (अन्न: पात्य इष्टी). परंतु खांडल आणि चित्पावन यांच्यात ती मोठ्या प्रमाणावर आहेत. शतकानुशतके टिकवलेली ही आडनावे म्हणजे प्राचीन यज्ञपरंपरेवर प्रकाश टाकणारा आणि संशोधनाला साहाय्य करणारा किरण -समुहच होय.
     खांडल आणि चित्तपावन यांच्या आडनावातील समानता पुढील निर्दशक सुचीवरुन ध्यानात येईल. 'खांडल विप्र महासभा का इतिहास' ( लेखक :श्री.जी पी.सुंदरिया) या ग्रंथाची पृष्टे ४५ ते ४९ पहावीत. सुचीत संस्कृत आधिकारनामे प्रथम व नंतर त्यांचे राजस्थानी व मराठी अपभ्रंश दिले आहेत. मठालय-मठोलिया -माटे ( एकामंडपाचा आधिकारी) सामर-सामला-सामल, सावरकर? ( देवाशी संवाद साधणारे) रणोद्वाही -रिण्या -रानडे, राणे (यज्ञरक्षक) बिल्ववान-बीलवाल -बिवलकर ( बेले ,वेलफ़ळे जमाविणारे ) चौल-चोटिया-शेंडे ( केशकर्तनाची व्यवस्था ) सुंदर-सुंदरिया-मनोहर (प्रसाधन व्यवस्था) बठोबा -बठोठिया-बडेबाड (वडाच्या सामिधा) झपनाट्य-झरवाना दिया-कानडे ( यक्षानाट्य ) चरुस्थाली-सुथंला-ताम्हनकर (स्थाली ताह्मन) त्रिवारी -तिवारी -सोवनी (सोमरसाचे त्रिवार सेवन) बिल्व -बिल -भिडे चापेकर (धनुष्य-बाण) गोधुली य-गोधला -गोंधळे कर (संध्याकाळचे स्तवन) डिंडम -डिंडवाणिय -दांडेकर (वाद्य व्यवस्थापक) गोरस-गोरसिया-गोरे, गोडसे (गायीचे दुध पुरविणे) गोवल - गोवल - गोळे (गाईचा संभाळ) घूगोल -दुगोलिया -दुगल ( नक्षत्राचा अभ्यास ) प्रवाल - परवाल -बाळ (मंडपशोभेसाठी पालवी) नवहालक - नवलाह - लागु (हाल-लांगुल, नांगर) हुचर-हुचारिया -गांधारे ( हुचुर नामक गंधर्वाचे आवाहन ) पिप्पल -पीपल वा -पिंपळखरे (पिंपळाच्या सामिधा पिंपळकार) पराशला- परशला-रसाळ (सामिधा जमाविणे) घटवाल-घाटवाल -घाटे, गाडगीळ (गाडगे-वट, जलकुंभ धारन करणारे) टंकहारी-टंकहारा-टकले (टंक-नाणी) निधानीय -नानु, निटाव्या - नातु (एकमंत्र समुह) दर्भशायी-दाभडा - दबके दामले निष्ठर -निठुरा -नित्सुरे (बुकलुन बोकड मारणारा) व्यवहारक-बोहरा-बेहेरे (व्यापारी वस्तु पुरविणारा) भुर्भर -भुभ्रा - बर्व (भराव टाकुन यज्ञभुमीसारखी करणे) विभाजीय - बांटवा - वाटवे, भागणे, भागवत ( दक्षिणावाटणे ) श्रेत्रिय-सोती-काणे (श्रोतु - कान, मुळ अर्थवेद भ्राष्ट्र - भाट विडा - भाटे ( स्वयंपाक व्यवस्था )
     यज्ञातील अनेक विभागांशी संबधित अशी समान कुलनामे खांडलांत आणि चित्पावन असली तरी चिपळुण मधील चित्तीप्राकियेच्या सिध्दीनंतर त्यांनी स्वतंत्रज्ञाति नाम घेणे स्वाभाविक होते. ते म्हणजे चित्पावन - चितीच्या सिध्दीने पावन झालेले, मान्यता पावलेले या यज्ञानंतर त्यांना जे भुवि भाग दक्षिणा आणि दान दिलेल्या भुमीला अग्रहार असे नाव आहे. जे यामुळेच गुहागर, दिवेआगार अशी ग्रामनामे कोकणात आहेत. एका आडनांवाच्या कोकणस्थाचे एकच मुळ गांव असते व तेथे त्यांचे कुलदैवत असते याचे ही कारण वरील प्रकारची कोकणाची वसाहत होय. ओक्कल, औदीच्य, नागर, हविक वगैरे ब्राह्मण ज्ञाती अशाच अनेक प्रदेशांत आणल्या गेल्या व तेथेच स्थायिक झाल्या. ब्राह्मण याचा मुळ अर्थ त्या काळी प्रचलीत होता; तो म्हणजे वेदविद्या आणि यज्ञकर्मातील नैपूण्य. यज्ञ हे ब्रम्हाचे मुर्त स्वरुप आणि त्याचे साधक व उपासक ते यज्ञवेत्ते आणि वेदाभ्यासी ब्राह्मण -ग्रंथ असेच नाव आहे. द्वादशीच्या भोजनाचे भट-भिक्षुक ब्राम्हण हा पुष्कळच नंतरचा प्रकार आहे, अशा वैदिक आणि याज्ञिक ब्राह्मणांनी स्वत: शेती करावी अशी अपेक्षा नसे त्यांच्या कुल वाटे केतकाम करणारे श्रामिक म्हणजे कोकणात ज्यांना कुळवाडी म्हणत ती जमात. अशा पुरोहितांच्या वस्तीवर कसलाही कर आकारला जात नसे .अग्रहाचे रक्षण हे नायर जमातीकडे असे. नायर याचा अर्थ नेते, अनार्य नव्हे.

 
मागे     पुढे          
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+