करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
            संप्रणाली
 
            माहितीचे मुद्दे
 
            संर्पकासाठी
 
करमकरांची कुलदैवते, कुळधर्म इ.- 1  2  3  4  5  6  7      
 

असे महत्त्व कुळाचार कुळधर्माला दिलेले आहे. कुळधर्म कुळाचाराबद्दल विशेषत: स्त्री वर्ग जागरुक असतो. आमच्या करमरकर भागिनी निश्चितच हे सर्व कुळाचार पाळीत असतील. या कुलदैवतांच्या व्यातिरिक्त करमरकर घराणी ज्या ज्या प्रांतात गेली व वर्षानुवर्ष राहिली त्या त्या ठिकाणाच्या देवतांना आपल्या दैनदिन पुजा पाठात समावेश केल्याचे दिसते आम्हा मंगळ वेढाच्या करमरकर घराण्यात बहुतेकांच्या देवघरात विठल रखुमाईच्या मुर्ती पुजेत आहेत यांस कारण आम्ही "भुवैकुंठ" पंढरपूर क्षेत्राच्या पारिसरात आहोत. शिवाय वैयाक्तिक उपास्य दैवते ही असतात -ती निराळी.
     गेली शंभर वर्ष चित्पावनांच्या पुर्वपीठिकासंबंधी अनेक विद्वानांनी अनेक सिध्दांत प्रस्तुत केले आहेत. न्यायधीश चापेकर, रावबहादुर मंडलिक, इतिहासाचार्य राजवाडे, भारतचार्य वैद्य, इरावती कर्वे, व डॉ. राज पुरोहित हे त्यांतील काही प्रमुख होते.
चापेकरांच्या मते काही चित्पावन आडनावे व्यंगदर्शक आहेत आणि काही ग्रामनांमाशी संबंधित आहेत. चित्पावन परदेशातुन समुद्र मार्ग गुहागरला उतर्ले व कोकणात त्यांनी वसाहत केली. आडनावांची गोत्रवार विभागणी व कुलदेवता ची उपासना याच्यांपलीकडे विशेष मौलिक विवेचन यांच्या 'चित्पावन' या ग्रथांत नाही. नित्सुरे, माटे, काणे ही उपनावे झोपाळुपणा, लंगडेपणा, चकणेपणा यांवरुन आली असे म्हणणे संयुक्तिक नाही. व्यंगदर्शक आडनावे कोणताही जमात शतकानुशतके जपुन ठेवीत नाही. कर्तुव्य, आधिकार, सन्मान, पदवी यांच्यावर आधारलेली गौरव,नावेच माणसांना प्रिय असतात. चापेकर चापेगावाहुन आणि बेहेरे बेहेरे गावाहुन आले असे म्हणण्यात शास्त्रीय सुसंगती नाही. त्यांनीच सांगितल्या प्रमाणे एका नावाची अनेक गावे सर्वत्र विखुरलेली असतात मानव समुह जेव्हा व साहतीसाठी स्थलांतर करतात तेव्हा विशेष प्रकारच्या संधी प्रातिष्टेचे आणि उत्कर्षाचे अवकाश त्यांच्या डोळ्यासमोर असतात. एक कुटुंब एका गावाहुन, दुसरे दुस-या गावाहुन असे अलगपणे वसाहतील निघाले असे घडत नाही. काही प्रबळ प्रेरणा, काहीतरी असामान्य आवाहने अशा संक्रमणा मागे असतात. तसा विचार चापेकरांच्या विवचनात नाही. परशुराम -चारित्राच्या दृष्टीने श्रीमान बाबुरावजी पारखे यांचा 'रामयशोगाथा' हा ग्रंथ आधिक अभ्यासनीय आहे.
     इतर काही उपपत्ती चित्पावन या ज्ञातिनावावर आधारित आहेत. इजिप्तपावन (इजिप्तहुन आलेले) क्षितीपावन (कोकणाची वसाहत करणारे ) चित्तपावन (पावित्र चित्ताचे यातील काही होत काहीना तर यहुद्यांची हरवलेली जमात (लॉस्ट्र ट्राइब) म्हणजे चित्तपावन असे वाटते. ते ही गोष्ट विसरतात की ज्यु हे रोमोटिक वंशाचे अर्थात आर्येतर आहेत. अन्य काहीची अशी समजुन आहे की सिकंदराचे काही सौनिक मागे राहिले त्यांचा वंश म्हणजे चित्तपावन पोर्तृगीजाच्या संपर्काने ही गौरवर्णी ताज सिध्द झाली असे सुचविणारे तत्वचिंतक ही होऊन गेले कोळ्यांना परशुरामाने ब्राह्माण दिले ते हे नव -ब्राह्मण अशी पुरण कथा आहे. एका आख्यायिके प्रमाणे चित्तेपासुन निर्माण झाले चित्तपावन मातृघातकी परशुरामाला यज्ञासाठी ब्राह्मण हवे होते इतर कोणी संमती देइना तेव्हा चित्तेवरील प्रेतांना सजीव करुन त्याने ही ज्ञाती निर्माण केली असा येथील आशय आहे. याचा समावेश गॅझेटियरमध्ये ही अगत्याने केलेला आहे.
     या सर्व समजुती आणि उपपत्ती यांच्या मुळाशी कोकणस्थांच्या संबंधीचे कुतुहल नक्कीच आहे. परशुरामाने यांना यज्ञासाठी आणले हेही सामान्य अर्थाने खरे आहे. जशी सर्व लेणी पांडवानिर्मित (पंच महाभुतांचा काव्यमय निर्दश ) तसे सर्व यज्ञ परशुरामाने सिध्द केलेले असे समजण्याची परंपरा आहे. बौध्दांनी यज्ञाचा निषेध केल्या नंतर पुन्हा यज्ञसंस्थेने प्रवर्तन करावयाचे तर त्याला अवतारी पुरुषांचा पुरस्कार आवश्यक होता परशुरामाचा परशु आता क्षत्रियांत कन राहता तो सामिधा तोडण्यास उपयुक्त असा झाला. त्याला यज्ञपती अशी पदवी मिळाली केरळातील परशुराम मुर्ती केवळ परशु धारी आहेत धर्नुधारी नाहीत. शक-हुण्यांच्या अत्याचारी आक्रमणांनंतर राष्ट्ररक्षणार्थ ब्राह्मण क्षात्रियांना यज्ञासाठी पुन्हा एकत्र आणणारे या अवताराचे नवे स्वरुप संकल्पिले गेले.
     चित्ती (चैत्य किंवा चयन ) म्हणजे यज्ञासाठी असणारा विशेष व्यवस्थेचा स्थंडिल किंवा ओटा. या शब्दाच्या अर्थांचा गोंधळ झाल्यामुळे तो चित्तेशी जोडण्यात आला ही व्युपत्ती या ज्ञातीला इतकी आप्रिय वाटली की चित्तपावन हे आभिधान सोडुन ते स्वतला कोकणस्थ म्हणवु लागले. परंतु या चित्तेमागे असणा-या चैतन्याचा शोध घेण्याचा प्रयत्त्न मात्र झाला नाही. प्रस्तुत लेख हा लेखकाच्या या विषयावरील संशोधनाचा सारांश आहे.

मागे पुढे          
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+