करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
        संप्रणाली
 
        माहितीचे मुद्दे
 
        संर्पकासाठी
 
करमकरांची कुलदैवते, कुळधर्म इ.- 1  2  3  4  5  6 7           
 

     यानंतर तिथे आपोआप व्यापा-याची वस्ती होई. यज्ञसंस्थेभोवती त्याकाळची लोकव्यवस्था आणि अर्थव्यवस्था नियोजित केली जाई. पुर्वी निर्दशित केल्याप्रमाणे हे यज्ञ पुरोहित केवळ दक्षिणा स्वीकारणारे याचक अथवा भिक्षुक नसत. ज्यांनी स्वत: सात - सात यज्ञ केले, दाने आणि दक्षिणा दिल्या त्यांनाच पौरोहित्याचा आधिकार असे. 'तेन त्यक्तेन भुंजीथा:' या उपनिषादांचा आदेशाचे यात पालन होई. संपत्तीच्या वित्तरणाची ही व्यवस्था होती त्यातुनच उपभोगाच्या खरा आनंद मिळतो. या महान सत्याचा वस्तुनिष्ट पाठयज्ञ संस्थेतुन समाजासमोर सतत ठेरिला जाई.
चित्तपावनांची यज्ञप्रवणता ते दोन वेदांचे अभ्यासक होते यावरुन्ही दिसुन येईल .महाराष्ट्रातील इतर मुख्य ब्राह्मण ज्ञाती ऋग्वेदी अथवा यजुर्वदी आहेत. परंतु चित्तपावनाची दोन्ही वेदप्रचालित असत कारण ते यज्ञकर्मातील प्रमुख वेद आहेत. इतर दोन वेदांचाही अभ्यास विशेष अभ्यास म्हणुन केला जाई. कीत्येक शतके यज्ञपरंपरा संभाळणा-या या ज्ञातीत वर दिलेल्या आडनावांहून इतर अनेक यज्ञसिध्द कुलनामे आहेत. यज्ञविशेष यज्ञसाहित्य, यज्ञातल्या सहय्यक व्यवस्था यांवर आधारलेली ही उपनाव आहेत. उदा. पुढे आहेत.
     आपटे (आप्तोर्याम यज्ञ), साढमाने (सौत्रामणि यज्ञ), परांजपे (सोमयज्ञांना प्राजापत्य म्हणत त्यावरुन प्राजापत्ये), घारपुरे (गार्हपत्य यज्ञक्रिया), पेठे (प्रस्थापति बृहस्पातिसवाच्या यजमानांची पदवी), मराठे (स्रमाट ही वाजपेयी यजमान - पदवी) छत्रे (वाजपेयाच्या यजमानाला शुभ्र छत्रांचा मन असे) आठवले ( अध्वर म्हणजे यज्ञ ), बापट ( बपा-बोकडाच्या जठरातील आवरण - त्याची आहुती देणारे ) तुळपुले (तुला पुरुष -यज्ञात अनेक वस्तुंची तुला करणारे), गणपुले (गणपुरुष - उपस्थित समाजातील प्रमुख व्यक्ती ), साने ( सामज्ञ - सामदेव जाणणारे ), जोग (छांदोग्य वेदपाठक), बाम (ब्रह्मा प्रमुख पुरोहित ), गद्रे (आग्निघ्र- पुरोहित), हाडे होळे (होतो -पुरोहित), पोटे (पोत्र - स्वच्छतेची व्यवस्था ), नेने (नेष्ट्र यजमान - पत्न्नीला मंडपात आणणे), साठे (सदस्य -पुरोहित), परचुरे (प्रस्तोत्रा -पुरोहित), मंडलिक ( वेदीभोवती मंडले काढणारा ), खरे (खांदरे खैर), घाणेकर (घनापाठी), फ़डके (पदपाठी), जाईल (जयपाठी), खांबेटे करमरकर (क्रमवेत्ते ,क्रमकार), सहस्त्रबुध्दे (शस्त्रनावाच्या प्रदीर्घ मंत्राचा व्यासंग), कोल्हटकर (कुलत्य - कुळीथ पुरविणारे), तिलक (तिल-कार ), खाडिलकर (कदली कार), केळकर(केळीची तोरणे), करंदीकर (कर्कधु फ़ळ), कानिटकर (कानध -यज्ञ क्रिया), दाते (द्र्ष्टा- अधीक्षीक), मधुमते (मधुमंथ - मधुपर्क), गानू (मंत्रगान्), कर्वे (कल्प - अद्ययन शाखा), आचवल (अश्व मारणारा), भावे (संभवीने - करमणुकीच्या व्यवस्था), वैद्य (वेदवेत्ते).
यज्ञातील नामे आदरार्थी बहुवचनी असतात. त्याचाच मराठी अनुवाद नेने, माटे, रानडे, अशा एकारान्त आडनावांत दिसुन येतो. ही आभिधाने संस्कृतमध्ये 'कार' प्रत्ययाने शेवट होणारी असत. हा संदर्भ विसरला गेल्याने ही उपनावे मराठीत 'कर' प्रत्ययान्त झाली आहेत. परंतु त्या आडनावांचा ग्रामनामाशी संबंध नसुन यज्ञातील कार्याविशेषाशी आहे. शेकडो वर्ष वेदाभ्यास अणि यज्ञक्रिया यांचा अव्याहत व्यासंग घडल्याने कोकणास्थांत अजुनही वेदविद्येचे प्रेम, संस्कृतीची आवड, सामाजिक जाणीव व त्याग यांचे अवशेष प्रकर्षाने आहेत. या ज्ञातीतील श्रेष्ट व्यक्तींची नामावली देऊन लेखाचा विस्तार करावा अशी आवश्यकता नाही. इतकी ती सुविख्यात आहेत. पेशवाईचा काळ वगळुन ही पुढे दिलेली आधुनिक धुरिणांची नावे पुरेशी निर्दशक ठरावीत-न्यायमुर्ती रानडे, नामदार गोखले, लोकमान्य टिळक, कवी केशवसुत, स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य विनोबा भावे, महर्षी कर्वे, डॉ केतकर अणि महामहोपाध्याय डॉ.काणे.
     यज्ञसंस्थेचा एक महत्त्वपुर्ण वारसा म्हणजे सामजिक उत्कर्षाची सामुहिक प्रेरणा आणि त्यासाठी आवश्यक ती सांघिक कृती. यज्ञाच्या आरंभी तानुन सुयानावाचा विधी असे. तांब्याचे मोठे पात्र तुपाने भरले जाई आणि त्याभोवती उभे राहुन ऋग्विज शपथ घेत. आपापसातले वैयाक्तिक हेवे-दावे आणि विरोध यज्ञ सिध्दीच्या आड न येऊ देण्याची ती शपथ असे. कार्य पध्दती संबधी मतभेद झाले तर ब्रह्मा हा जेष्ट पुरोहित जो निर्णय देईल तो निर्विवाद्पणे मान्य होई. ही यज्ञ पुरोहितांची वृत्ती या ज्ञातीत अजुनही आढळते. मुलत: अत्यंत व्यक्तिनिष्ट प्रवॄतीची ही मंडळी सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षाणिक कामात समरसतेने भाग घेतात. कार्यासाठी आजीव सेवकत्व ही प्रथा पुण्यात प्रथम आरंभित झाली हे सर्वश्रुतच आहे.
(खांडिलकर कुलवॄत्तांतावरुन.)

 

 
मागे  
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+