करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
        संप्रणाली
 
        माहितीचे मुद्दे
 
        संर्पकासाठी
 
पेशवेकालीन करमरकर  
   
आम्ही करमरकर घराण्याचे पुर्ववृत्त 1 2 3 4 5           
 
पती सुखरुप परत आल्यावर तिने नवस पुर्ण केला, त्यानंतर तीनशे वर्ष परशुराम मंदीरात हिंदु आणि मुस्लिम भाविक एकाच भावनेने येऊ लागले. कल्याणमधील हाजीमलंग, दिल्लीतील निजामुद्दीन व अजमेरच्या चिस्तीचा दर्गा या प्रमाणेच परशुरामाचे मांदिर हे हिंदु मुस्लिमांनचे श्रध्येचे स्थान बनले. शिवाजी महाराज राज्यभिषेकानंतर या परशुराम मंदीरात दर्शनाला आले होते. त्याचवेळी समर्थ रामदास भारतभर भ्रमण करुन व देशाची दयनीय स्थिती अवलोकन करुन परशुरामांच्या दर्शनाला चिपळुणला आले होते. महाराजांची तेथे भेट झाली व समर्थांचे आशिर्वाद राजांना मिळाले. परशुरामाचे दर्शन घेताना समर्थांनी उद्वार काढले,-
महाकोप अग्नी ऋषी जमदग्नी
समर्था तया जाणि जे सर्व सुज्ञी॥
सदा सर्वदा घेतसे नाम तुझे
वारिष्टा स्वभावचि हे गोत्र माझे ॥
किती एक मागे बहु युध्द केले
किती वेळा या ब्राह्मणा राज्य दिले
आकस्मात सामर्थ्य ते काय झाले॥
चिरंजीव आहेस ऎसी वंदनी
समर्था तुझे चित्त काठिण्य किती
तुझे नामधारी तुला हे कळेना
कृपाळुपणे चित्त कैसे वळेना ॥
(समर्थाचे गोत्रही हे जमदग्नीच होते.)
करमरकर आडनाव कसे पडले?
कोकणास्थांची मुळ आडनावे साठ त्यात करमरकर आडनावाचा समावेश नाही यांचे कारण हे आडनाव एका विशिष्ट घटनेवरुन पडले कोकणातल्या नाचणे गावी वास्तवास असलेल्या बाबासाहेब करमरकरांनी सांगितलेल्या महिती वरुन असे दिसते की पेशवाई स्थापन करणा-या बाळाजी विश्वनाथ भटांचे एक बंधु हबश्यांच्या जाचाला कंटाळुन गोव्यात परागंदा झाले गोवा हे त्या वेळी महाराष्ट्राचाच एक भाग होता हे भट तेथे विश्रांतीसाठी "करमरी" या झाडाच्या खाली विश्रांतीला थांबले, म्हणुन 'करमरकर'. सावलीखाली थांबले, तेथेच एक देवीचे देऊळ होते, तिचे नाव देवी केळाई हे करमरकर नंतर परत नाचण्याला आले ती त्यांनी आपली कुलस्वामिनी मानली त्यांनी आपले आडनांव करमरकर लावायला सुरुवात केली ही हकीकत विश्वसनीय वाटत नाही कारण पेशवे झालेल्या भटांचे गोत्र गार्ग्य आहे तर करमरकरांचे गोत्र काश्यप आहे. (आता भट हे आडनाव द्विगोत्री आहे. त्यातले दुसरे गोत्र काश्यप आहे.)
तेव्हा पेशवे झालेल्या भटांचे धाकटे बंधु करमरकर झाले असणे शक्य नाही बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना दोन बंधु होते. पण त्यापैकी कोणीही कोकणातुन बाहेर गेले नाही व असे त्यांच्या त्रोटक इतिहासावरुन दिसते. तेव्हा जे करमरकर झाले, ते भट काश्यप गोत्रीचे असले पाहिजेत हे उघड आहे. करमरीच्या झाडाखाली विश्रांतीला बसले म्हणुन करमरकर या नावाशिवाय कमरक, क्रमक, करमल अशाही नावाने ओळखले जाते. या झाडाचा घेर वडाच्या झाडासारखा मोठा असतो त्याची फळे पाच सहा धारधार कोन असलेली साधारणात: लहानशा काकडीच्या आकाराची हिरवट पिवळट रंगाची असुन आंबट गोड अशी त्याची चव जिभेवर रेंगाळते. हे झाड बागेतही लावता येते उष्ण दमट हवामानात त्याची चांगली वाढ होते थोडया सावलीच्या जागीही ह्या झाडास भरपुर फळे येतात याची आंबट गोड फळे औषधासाठी तसेच लोणची मुरांबे यासाठीही वापरता येतात गोव्याला काही दैवताना कौल लावण्यासाठी करमरीची पाने वापरतात. श्रीलंका, मलेशिया येथे करमरीची भरपुर झाडे आहेत. मलेशियन भाषेत करमर, करमल या नावाला "करबोला" असे म्हणतात. ह्या फळांची मीठ, मिरपुड व साखर व त्यात वाफवलेले बीट साले काढुन किसुन घातल्यास छान कोशिबीर होते. सर्व करमरकर भागिनीनी आपले आडनांव ज्यामुळे पडले त्या ह्या करमरी झाडाच्या फळाची कोशिबीर, मुरांबा, लोणचे जरुर करुन पहावे असे सुचवायवेसे वाटते. आपण म्हणतो ना नावांत काय आहे ?समजलाना आता नामाचा माहिमा.
करमरकराचे आध्यात्मिक विवेचन
करमरकर हे आडनाव कसे पडले हे आपण वर पाहिले. या आडनावाचीया आडनावांची आध्यात्मिक फोड करणारा लेख प्रा. पा. कृ. सावळापुरकर यांनी लिहिला असुन तो करमरकर मंडळींना उद्बोधक वाटेल. ते लिहितात, करमरकर या शब्द सांहितेत तीन आज्ञाधारक क्रियापदे आहेत, त्यांतील पाहिली आणि शेवटची आज्ञा एकच आहे. करुन मरायचे पण मरुन पुन्हा करावयचे हे कसे शक्य आहे? पण अधात्म व भक्ती विचारात ते शक्य आहे इतकेच नव्हे तर ते कर्तव्य ही आहे. आमच्या वैदिक आणि संत वाड़्मयाचा हाच आदेश आहे जे केवल देहात्मवादी आहेत, त्यांच्यासाठी हा आदेश नाही, पण "अहं ब्रह्मास्मि" हे तत्त्व ज्यांना मान्य आहे व त्यासाठी साधना करण्याचा ज्यांचा प्रयत्न्न आहे त्यांनाच ते लागु आहे आमच्या पुर्वाचार्यांनी ब्रह्म होणे वा ब्राह्मण होणे हे जीवाचे लक्ष्य मानले आहे ही एक मानासिक अवस्था आहे पशुपक्षी कीटकादी ज्या केवळ भोग योनि आहेत त्यांच्या करता ते लक्ष्य नाही पण मानव योनी ही कर्म योनी असल्याने तयाचे हे लक्ष्य आहे हे उघड आहे ह्या लक्ष्याप्रत जावयास अनेक साधने सांगितली आहेत, आधिकार परत्वे ती भिन्न असु शकतील, रुचीप्रमाणेही ही भिन्न असू शकतील. गीतेत "ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम" अशा दोन निष्टा सांगितल्या आहेत.
"तैसी दोन्हीही मते सुचिती एक कारणाते ! पारि उपास्ति ते योग्यते अधीन असे" असे ज्ञानेश्वर म्हणतात. त्यांचा वेग भिन्न असला तरी आंतिम स्थान एकच आहे. हा जो ज्ञानयोग आहे तो आमच्यासारखा प्राकृत प्रापचिकांना साधण्यासारखा नसतो.

मागे पुढे           
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+