करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
            कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
        संप्रणाली
 
        माहितीचे मुद्दे
 
        संर्पकासाठी
 
पेशवेकालीन करमरकर  
 
आम्ही करमरकर घराण्याचे पुर्ववृत्त 1  2  3  4  5           
 

दुसरे बाजीराव साहेबांना औरस मुलगा इ.सन १९१६ साली झाला होता पण तो तान्हा असतानाच वारला. बाजीराव साहेबांची एकंदर अकरा लग्ने झाली, शेवटी त्यांनी त्यांच्याच आश्रयाला असलेल्या मुळच्या पाश्चिम महाराष्ट्रातील माथेरान जवळच्या वेणुगांवाचे गार्ग्य गोत्री भटांपैकी महादेव नारायण भटयांचे तीन मुलगे दत्तक घेतले त्यातील पाहिले धुंडीराज हे पुढे १८५७ च्या उठावाचे सेनानी नानासाहेब पेशवे या नावाची प्रासिध्द झाले. "धोंडु राजा होईल त्याची किर्ती दुरवर पसरेल असे भाविष्य त्यांच्या बालपणी वर्तविले होते. धोंडो पंतांना संस्कृत, उर्दु, पार्शियन व हिंदी या भाषा उत्तम अवगत होत्या, ते इंग्रजीचे जाणकार होते. सर्व ऑगलो इंडियन वृत्तपत्रे, साप्ताहिके यांचे ते वर्गणीदार होते. शरीराने किंचीत स्थुल असुन त्यांचे डोळे तेजस्वी होते नीटनेटका पौशाख व जड जवाहरी घालण्याची त्याची हौस होती स्वभावाने ते स्वात्विक सरळ व मधुर भाषीय होते उत्तम खेळाडु व जलतरपटुही होते बिलिअर्ड उत्तम खेळत असत इंग्रजांचे आदरातिथ्य करणे त्यांना आवडे इंग्रजाचे उद्योग चालिरीती याचे त्यांना कुतुहुल असेते नेहमी मोठ्या मोठ्या मेजवान्या व भेट वस्तु देत त्यामुळे ते इंग्रज आधिका-यात लोकप्रिय होते. इंग्रज त्यांना बिठुरचे महाराज म्हणत."
अशा या शुर सेनाची एकंदरीत तीन लग्ने झाली, त्यापैकी पाहिली व तिसरी पत्नी या करमरकरांच्या कन्या. पाहिल्या पत्नी साळजाबाई. बिठुर किंवा ब्रम्हार्वत येथे लवकरच निवर्तल्या. तथापि, ज्यांच्या आपल्या करमरकर कुलोत्पनाना सार्थ आभिमान वाटेल अशा करमरकर कन्या म्हणजे नानासाहेबांच्या तिस-या पत्न्नी त्यांचे नाव सुंदराताई. त्यांचा जन्म १८४६ चा लग्नात त्या १० वर्षाच्या होत्या. सासरचे नांव कृष्णाबाई उर्फ़ पार्वतीबाई. सांगलीकर पटर्धनांनच्या नात्यातले रामचंद्र सखाराम करमरकर यांच्या त्या कन्या. या रामचंद्र पंतांना गोंजुमामा म्हणत. कृष्णाबाईचे लग्न ठरविण्यात पेशव्यांचे उपाध्ये कर्व, सांगलीला मुलीला पहावयास आले, तिच्या पत्रिकेवरुन या मुलीच्या लग्नानंतर लवकरच युध्द व रक्तपात होईल असे भाविष्य वर्तविले होते, पण सुंदर असल्याने त्यांना पसंत करण्यात आले व त्यांचा विवाह नानासाहेबांबरोबर ब्रह्मावर्त येथे झाला.
५ जुन १८५७ ला कानपुर येथे नानासाहेबांनी बंडाचे नेतृत्व स्विकारले जुनच्या ३० तारखेला त्यांना बिठुरला राज्यभिषेक करण्यात आला व १ जुलैला त्यांनी बंडाचा जाहिरनामा प्रसिध्द झाला. तथापि, या बंडात नानासाहेबांना देशत्याग करावा लागला व ते नेपाळच्या त-हाईत निघुन गेले. कानपुरची लढाई नानासाहेबांनी जिंकली तेव्हा बिठुरला दुस-या बाजीरावांनी पुण्याहुन आणलेल्या पेशव्यांच्या ऎतिहासिक सिंहासनावर त्यांचा राज्यभिषेक करण्यात आला होता. बंडातील पराभवानंतर ब्रिटीशाचे शुक्ल काष्ट पेशवे मंडळीच्या मागे लागले तेव्हा शेवटच्या बाजीरावाच्या दोन पत्नी मैनाबाई, सईबाई व नानासाहेबांच्या पत्न्नी कृष्णाबाई यांना सर्वजण काकुसाहेब म्हणत. अशी सर्व मंडळी नेपाळ सरकारच्या आश्रयाला काठमांडु येथे गेली.
बाजीराव साहेबांच्या पत्न्नी सईबाई यांनी नेपाळमध्ये जडजवाहिर विकुन राणीगंज हे छोटे संस्थान स्थापन केले. नेपाळ सरकारकडुन यांनी आठ गावे खरेदी केली. दिवाणी व फ़ौजदारी हक्क ही त्यांना मिळाला. सईबाई व काकुसाहेब तेथे राहु लागल्या त्यामुळे त्याला छोट्या संस्थानाचे रुप आले व गोविंदपुर ही राणीगंजची राजधानी म्हणुन ओळखली जाऊ लागली तेथे सईबाईंनी वाडा, कचेरी, राम व हनुमान मांदिरे बांधली. कचेरीत पेशव्याची गादी व्यवस्थातिपणे ठेवलेली असे नेपाळच्या राजा राणी सारखीच सोन्याचा दांडीच्या झालरी असलेल्या छत्रीचा मान त्यांना दिला जाई. त्यांना नेपाळ सरकार तनखा देत असे पशुपतीचे दर्शनाला जात असताना राजछत्र वापरण्याचा त्यांना आधिकार होता. देवपाटण ही पशुपतीनाथाच्या जवळच राजघराण्यातील लोकांची अंत्यसंस्काराची जागा होती तेथेच पेशवे घराण्यातील स्त्रियांचे अंत्यसंस्कार झाले. राणीगंज येथील वाड्यात पेशव्याची गादी तिस-या मजल्यावर ठेवलेली असे, तेथे कोणाला जाण्याची परवानगी नव्हती. तेथे रोज रात्री पाणी व फराळाचे पदार्थ आणि दिवा ही ठेवत. विष्णुकली नावांची हत्तीण दररोज या पेशवे गादीला सकाळी सोंडेने कुर्निसात करत असे. नेपाळचे दिवाण या दोन्ही स्त्रियांना दैवतेसमान मानत असे. पेशव्यांच्या सईबाई प्रमाणेच पेशवे पारिवाराची माहिलांची प्रातिष्टा त्याच्या सुनेने म्हणजे काकु साहेबांनी आपल्या विनयाने पेशवे कुळातील "विनयावती कांता" ही परंपरा उज्वलतेने सांभाळली नी त्यांच्या सासुबाई व प्रजा या दोघांनाही आदर्श वाटे. काकुसाहेबांना मुल बाळ झाले नाही. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांचे राणीगंज येथील राजवाड्यात १८८६ रोजी निधन झाले. पशुपतीनाथच्या जवळच राज घराण्यातील लोकांच्या अंत्यसंस्कारच्या जागेत पेशवे घराण्यातील या राणीचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिवशाहिच्या अस्तानंतर मराठेशाहिच्या घराण्याची दिशा बदलु लागली व राजकीय सत्ता सम्राटाच्या समीकरणाची नवी मांडणी झाली. ज्याचे न्यायमृर्ती रानडे यांनी 'मराठा राज मंडळ' असे वर्णन केले त्यात या पेशवे घराण्याचे स्थान पाहिले होते. याच घराण्यातील नानासाहेबांनी ब्रिटीशांविरुध्द बंडाचा झेंडा उभारला, त्यांची पत्न्नी आणि नंतर राणी म्हणुन आपल्या कर्तबगाराने हुशारीने कृष्णाताईंनी (काकुसाहेबांनी) पेशवाईची प्रातिष्ठा १८८६ पर्यंत जपुन ठेवली. अशा या राणीपदी विराजमान झालेल्या कर्तबगार कुलोत्पन्न कन्येचा करमरकर मंडळींना अभिमानच वाटेल. ("पेशवे घराण्याचा इतिहास" प्रमोद ओक लिखीत ग्रंथावरुन).

 
मागे      
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+