आमच्यासाठी कर्म योग सांगितला आहे पण या कर्माच्या मागे अट आहे फलेषु कदाचन" ! कर्माचे बंधन नको असेल तर ही अट मानलीच पाहिजे मग त्या फळाचे काय करायचे तर ते ब्रह्मार्पण करुन टाकावे, हे आम्हांला जमेल काय? यापेक्षा कठीण साधन योगयज्ञ त्याला राजयोग हे प्रातिष्टीत नांव आहे. सामान्यांना यात गाति नाही त्यांना साधन काय तर भक्तीत साधनांचा बाडिवार पण त्याला सुध्दा अटी आहेत म्हणुन भक्तीचे ही पुढे शास्त्र झाले
लक्ष्याकडे जाणा-या साधनांचे काठिण्य आपण पाहिले ही साधकावस्था म्हणजे "कर" ची अवस्था. त्यातुन जो श्रमाने, पुर्वपुण्याईने उतीर्ण झाला त्यालाच द्वितीय "मर" ही अवस्था प्राप्त होते. "मर" अवस्थेसाठीच पाहिले "कर" हे साधन आहे, पण हे "मर" काय प्रकरण आहे ? त्यातील "मर" हा पार्थिव देहाचा पंच भौतिक मृत्यु नव्हे ते प्रथम लक्षात घेतले पाहिजे. जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याचे शरीर नाहीसे होणार हा निरपवाद नियम आहे तो मृत्यु कोणी टाळुच शकत नाही. मृत्यु असा अपारिहार्य असल्यावर "मर" अशी पुन्हा आज्ञा देण्याचे प्रयोजन काय अशी आज्ञा ज्याअर्थी आहे त्या अर्थी हे "मर" सगळ्याना साधण्यासारखे नाही हे उघड आहे. देह भाव नाहिसा होणे ह्या स्थितीस मृत्यु म्हटले आहे व येथे "मर" या आज्ञेत ही स्थिती आभिप्रेत आहे. तुकारामांनी या मरणाचे वर्णन पाच अभंगात अत्यंत सुंदर केले आहे. ह्या अभंगातुन "देहोऽहं" बंधनातुन सुटुन "अहंब्रह्मास्मि" पर्यंत तुकारामांचा प्रवास झाला याचा आनंद व्यक्त झाला आहे हीच दुसरी "मर" ही अवस्था. तुकारामांचा अट्टाहास हा 'शेवटीचा दिस गोड' होण्यासाठी म्हणजे कर मधुन मर ही अवस्था येण्यासाठी होता हिच जीवनमुक्त अवस्था. ही अवस्था आल्यावर यावर तिसरी "कर" ची अवस्था आपोआपच येते त्यासाठी वेगळ्या आज्ञेची गरज नाही पण येथे ती आज्ञा केली आहे कारण पुर्व सवयीने कर्म होतच राहतात पण त्यात देहभाव नसल्यामुळे त्यांचे बंधन कर्त्यास उत्पन्न होत नाही. ही कर्म केवळ आत्मानंद वा लोकासंग्रह ह्या साठीच होत असतात. जीवनमुक्त कर्मयोगी व भक्त देहपात होईपर्यंत आपली पुर्व कर्म वा भक्ती चालुच ठेवतो ज्ञान पुर्व भक्तीची स्थिती-साधकाव्यवस्था हा पाहिला "कर" तुकारामांच्या भाषेत "आधी होता संत संग, मग तुका झाला पांडुरंग" ही सिध्दाची व ज्ञानाची म्हणजेच "मर" ची अवस्था आणि "त्यांचे भजन राहिना" ही शेवटची "कर" ची म्हणजेच अवस्था मानता येईल. या ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था मानता येईल या ज्ञानोत्तर भक्तीच्या अवस्थेत भक्तीचे नामस्मरणाचे प्रमाण आधिक वाढते असे तुकारामांचे मत दिसते.
लेखाच्या शेवटी प्राध्यापक म्हणतात की करमरकर या संज्ञेची फोड मला सुचली तशी केली आहे. ती त्या नामधारकांना गौरवाची वाटावी. इंग्रजीचा आश्रय घेऊन "डु डाय डु" असे भाषांतर करुन जे या नामांची कुचाळी करतात त्या प्राकृतांना मात्र या सज्ञेत गंभीर अर्थाचा आढळ होऊ शकतो हे कळल्यास धक्काच बसेल." (जीवन -विकास मार्मिक नागपुर जुलै १९८७ च्या अंकातुन )
१९८७ च्या नोव्हेंबरमध्ये मुंबईच्या वडाळ्याच्या एका शाळेमध्ये मातृदिन साजरा झाला त्यावेळी मुख्य पाहुण्या म्हणुन प्रासिध्द शास्त्रज्ञ डॉ. जयंतराव नारळीकर यांच्या मातोश्री कृष्णा ताई या होत्या. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या "विद्यार्थ्यानी नेहमी मृदु व नम्र आवाजात बोलावे, वाडमाधुर्यासारखी श्रेष्ट गोष्ट दुसरी कोणतीही नाही. भाषा कठोर असली तर वैर वाढते व उपकारही अपकार ठरतो" शेवटी त्या म्हणाल्या "प्रत्येकाने गोडबोले व करमरकर झाले पाहिजे" या दोन घराण्यांचा अशा रितीने एका विदुषानी गौरवच केला आहे व त्यात आपले करमरकर हे नांव असल्यामुळे त्याचा आपल्याला आभिमान वाटला पाहिजे.
अशा या उज्वल नामधारक करमरकर मंडळीपैकी काही जणांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात नाव कमावले आहे. त्याचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते. नौदल प्रमुख म्हणुन ज्यांनी वौशिष्टपुर्ण कामगिरी बजावली त्या व्हाईस ऍडमिरल करमरकरांनी जहाजावरील दिशा दिग्दर्शन यंत्र बिघडले असताना आकाशातील ता-यांचा मदतीने हजारो मैलांचा प्रवास करुन जहाज सुखरुप परत आणण्याचा पराक्रम केला ही कथा नौदलातील सौनिकांत अद्यापही कौतुकाने सांगितली जाते. धारवाडचे वकील व्ही. पी. करमरकर नेहरुच्या मांत्रिमंडळात मंत्री होते. पुण्याच्या सर परशुराम भाऊ कॉलेजचे प्रिन्सीपल र. दा. करमरकर हे संस्कृतचे पांडीत होते. तसेच प्रासिध्द शिल्पकार व्ही. पी. करमरकर यांचाही उल्लेख केला पाहिजे. मुंबई चे प्रासिध्द शल्य विषारद रा.ह. करमरकर हे कुशल सर्जन व प्राध्यापक म्हणुन प्रासिध्द आहेत. तरुण पिढीतील करमरकर मंडळीपैकी ज्यांनी आंतरराष्ट्रीय किर्ती मिळविली ते म्हणजे डॉ नरेंद्र कृष्ण करमरकर यांचा उल्लेख आर्वृजन केला पाहिजे. त्यांनी आपल्या शोधाने भारताची मान जगात उंचाविली प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रांतील उत्पादन व वितरण या शाखांमध्ये गाणिती शोधांनी क्रांती घडवुन आणली या पध्दतीमुळे संगणकापेक्षाही जलद रितीने संखाशास्त्र प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. अमेरिकेतील प्रासिध्द ब्रेल कंपनीच्या प्रयोग शाळेत डॉ नरेंद्र संशोधक म्हणुन काम करतात. नुकतीच त्यांची मुंबईच्या टाटा मुलभुत संशोधन केद्रात नेमणुक झाली आहे. करमरकर घराणी अनेक ठिकाणी विखुरलेली आहेत. नेपाळ, काठमांडु, पासुन ते थेट खाली कर्नाटकापर्यंत शिल्पकला, स्थापत्य, शल्य, चिकित्सा, पांडित, रंगभुमी, खेळ, वगैर क्षेत्रात करमरकर कन्या प्रत्यक्ष पेशव्यांची राणी म्हणुन वावरली त्यांचा तपशिल मनोरंजक असल्यामुळे खाली देत आहे.
पेशवे झालेल्या भटाचे बंधु करमरकर झाले. या आख्यायिकेला दुजोरा नाही हे वर लिहिले आहेच. तथापि आश्चर्यांची गोष्ट म्हणजे पेशव्यांशी जरी बंधुत्वाचे नाते सिध्द झाले नाही तरी पेशव्याकडे करमरकरकरांची कन्या "राणी" या पदावर आरुढ झाली. हा इतिहास पेशवाईच्या शेवटच्या पर्वाच्या उत्तरार्धातील आहे . |