करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
        संप्रणाली
 
        माहितीचे मुद्दे
 
        संर्पकासाठी
 
पेशवेकालीन करमरकर  
   
आम्ही करमरकर घराण्याचे पुर्ववृत्त 1 2  3  4  5           
 

करमरकरांचे गोत्र काश्यप - म्हणजे आम्ही कश्यप ऋषींच्या शिष्य पंरपरतले. कश्यपांचे वसतीस्थान काश्मीर -भारताचे नंदवन. तेथील नदीचे नांव कश्यपी. काश्मीर हे नांवच काश्यप ऋषीच्या नांवावरुन पडले. मीर यांचा अर्थ सागर किंवा सरोवर. कश्यपमीर म्हणुन काश्मीर. या महर्षी कश्यप ऋषींचा मोठेपणा काय वर्णावा ? कश्यप ऋषीनी अंणुचा शोध लावला. पू. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी आपल्या "ऋषी-स्मरण या प्रवचनाच्या पुस्तकात महर्षी कश्यप ऋषीना" भारतीय धरतीचा पिता"( फ़ादर ऑफ़ इंडियन सॉईल ) असे संबोधले आहे. त्यात ते म्हणतात, "कश्यप ऋषी ही एक अलैकीक शक्त्ती होती .त्यांनी अग्नीकडुन वेदविद्या, यंत्रविद्या व शस्त्रविद्या प्राप्त केली. परशुरामांकडुन पृथ्वीचे दान हातात आल्यावर त्यांनी भारताची पुर्नरचना केली (रिकंस्ट्रक्शन). वैश्यांना सोबत घेऊन त्यांनी संस्कृत्तीचे पुनरुथ्यान केले पुरुषार्थी तेजस्वी व संस्कृतीचे आणि नीतीचे उपासक बनाविले म्हणुन पृथ्वीला दोन नावे पडली. बुडणारी पृथ्वी उरुंनी वैश्यांनी वाचविली म्हणुन ती "उर्वी" तर महर्षी काश्यपांनी पुर्नरचना केली म्हणुन "काश्यपी" .
लोकांना काश्यपांबद्दल आत्यंतिक प्रेम व आदर होता व ते महर्षीना स्वत:चा पिता समजत म्हणुनच आज कोणाला स्व:तचे गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्राचा उच्चार करायला शास्त्राची अनूमती आहे विश्वातील सारी शक्ती पायाशी उभी असताना पायात खडावा व हातात कंमडलु धारण केलेले महर्षी काश्यप "वित्त शक्त्ती व बुध्दी शक्त्ती सत्ता व सामर्थ ह्या सा-या शक्ती जरुर संपादन करा पण त्या सर्व शक्तीचे एका व्यक्त्तीमधे केंद्रीकरण होऊ देऊन का " हा महान संदेश देऊन निघुन गेले सद्याच्या काळात या संदेशाचे मुल्य किती आहे ते सांगायची वेगळी गरज नाही.
आम्ही ऋग्वेदी-मुळवेद चार - ऋग्वेद, यजुर्वद, सामवेद, अर्थववेद .ऋग्वेदाचा उपवेद -आयुर्वद व्यासमूनीनी प्रथम आपल्या "पैल" या शिष्याला ऋग्वेद शिकविला वेद हे अनंत असल्याने भारद्वाज मुनींनी बम्ह्रदेवाजवळ प्रार्थना केली," वेदांत मज दावावे ।सर्व माते शिकवावे ।ऎसे वरदान द्यावे ।बम्ह्रा म्हणे भारद्वाजाशी। भिती नाही वेदांसी ।सर्व कैसे सिके म्हणसी ।वेद राशि गिरीमय ॥ ते देखो्नि आमित ।भय पावले (भारद्वाजांचे) चित्त ।जे द्याल उचित ।तेचि घेऊ पारियेसा गम वेदांचे मंत्रचाळ वेगळे केले तात्काळ ।ऎसी चारी् वेद प्रबळ अभ्यासी भारद्वाज ॥ ( गुरुचारित्र - अध्याय -२६वा ).
संस्कृतील या चार वेदातले प्राचीनतम वाड़्मय म्हणजे ऋग्वेद. त्याचा रचनाकाळ दहा हजार वर्षापुर्वीचा. त्या वेळी लेखन नव्हते. वेदांना म्हणुन श्रुति म्हणत त्यातील मंत्र, सुक्ते ऋषीच्या दैवी वाणीने ऎकु आली व ऋषीच्या अंत:चक्षूना ते दिसले हे सर्व मंत्र वाणीने उच्चारावयाचे व कृतीने ग्रहण करायचे व ते पाठ करुन दुस-यांना म्हणजे गुरुंनी शिष्यांना, पित्याने आपल्या मुलांना, तसेच, एका पिढीने दुस-या अशा रितीने सहस्त्रावधी वर्ष शेकडो पिढ्यांनी उच्चार वैशिष्टासह सर्व जतन करुन ठेवले हा इतिहासातला मोठा चमत्कार मानावा लागेल पुढे भगवान पाणिनीनी व्याकरण तयार केल्यामुळे भाषा शास्त्राची उत्पती झाली या ऋग्वेदाचे आठ भेद व पाच शाखा आश्वलायन, शांखालयान, शाकला, बाष्कला, व माण्डुका - "ऎसी या ऋग्वेद सी-त्रयोदश शाखाभेद" वेद अनंत असल्याने एका शिष्याला सर्व वेदाचे अध्यापन करने शक्य नव्हते प्रत्येक शिष्याचे एकाच शाखेचे अध्ययन केले.करमरकरामचे जे कोणी पुर्वज काश्यप ऋषीचे शिष्य असतील त्यांनी फ़क्त आश्वालायन शाखेचे अध्ययन केले असावे. म्हणुन आम्ही आश्वलयान शाखेचे. धार्मिक कार्यात गोत्रा बरोबर प्रवराचा उच्चार करावा लागतो त्याचा पाठ असा काश्यपावत्सारनैधृवेति।किंवा काश्यपावत्सार्सितेति॥

मागे पुढे          
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+